Corona Positive : बॉलिवूडमधील या अभिनेत्याच्या वडिलांना कोरोनाची लागण, बंगला केला सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 11:02 IST2020-05-13T11:01:08+5:302020-05-13T11:02:15+5:30

या अभिनेत्याचे वडील 67 वर्षांचे आहेत.

Corona Positive: Bollywood actor's father infected with corona, bungalow sealed TJL | Corona Positive : बॉलिवूडमधील या अभिनेत्याच्या वडिलांना कोरोनाची लागण, बंगला केला सील

Corona Positive : बॉलिवूडमधील या अभिनेत्याच्या वडिलांना कोरोनाची लागण, बंगला केला सील

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अभिनेता फ्रेडी दारुवालाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे फ्रेडीचा बंगला बीएमसीने सील केला आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.


हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना फ्रेडीने सांगितले की, सुरुवातीला माझ्या वडिलांना ताप आणि अंगदुखीचा त्रास होत होता. मात्र वातावरणातील फरकामुळे हा त्रास होत असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांना बरे वाटत नसल्याचे आम्हाला जाणवले. त्यामुळे दोन-तीन दिवसांनी आम्ही त्यांची कोरोना टेस्ट केली तर त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. सध्या तरी त्यांना डॉक्टरांनी घरीच आयसोलेट होण्याचा सल्ला दिला आहे.

पुढे त्याने सांगितले की, वडिलांना घरात आयसोलेशनमध्ये ठेवल्यामुळे आम्हाला त्याचा काही त्रास होत नाही आहे. आमचे घर मोठे असल्यामुळे सगळे व्यवस्थित स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत आहोत. पण आम्हाला फक्त आमच्या बाळाची काळजी आहे, कारण तो फक्त १५ महिन्यांचा आहे.


फ्रेडी दारूवालाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने हॉलिडे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी या चित्रपटात काम केले आहे. यात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. तर या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.

याशिवाय तो कमांडो 2, रेस 3 व फोर्स 2मध्येही झळकला आहे.

Web Title: Corona Positive: Bollywood actor's father infected with corona, bungalow sealed TJL