/>आॅस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट ली चा ‘अनइंडियन’ चित्रपट लव्हमेकिंग सीन्सवरुन विवादात सापडला आहे. या चित्रपटात
ब्रेट ली आणि अभिनेत्री शर्मिष्ठा चॅटर्जी यांच्यात काही लव्हमेकिंग सीन्स चित्रीत झाले आहेत, ते खूप लांब आहेत आणि ते शॉर्ट करावे तसेच काही सेकंदांपर्यंतच मर्यादीत ठेवावे असे काहींचे म्हणणे आहे. मात्र
ब्रेट ली म्हणतो की, या चित्रपटात मला असे दिसले नाही की ज्याला आपण अश्लील म्हणू शकू, चित्रपटातील दृष्य खूपच सुंदरतेने चित्रीत झाले आहेत.
ब्रेट ली असे ही म्हणाला की, मी निर्णय घेण्यास असमर्थ आहे की काय योग्य आणि काय अयोग्य आहे. मी आॅस्ट्रेलियन आहे, मात्र चित्रपटाची अभिनेत्री आणि निर्देशक भारतीय आहे, आणि हेच शर्मिष्ठा चॅटर्जीचे म्हणणे आहे की, मला असे वाटते की चित्रपटासाठी योग्य ती कॅटेगरी ठरविली जाईल आणि हा विना सेंसॉर रिलीज केला जाईल. हा चित्रपट इंग्रजीत निर्माण करण्यात आला आहे आणि चित्रपटाचे निर्देशक अनुपम शर्मा आहेत. चित्रपटाची जास्तीत जास्त शूटिंग सिडनीमध्ये झाली आहे. ब्रेट ली क्रिकेटरपासून हीरो बनला आहे आणि अशी चर्चा आहे की, तो ‘हाउसफुल-४’साठी एप्रोज करीत आहे.