बॉलिवूड कलाकारांचे वादग्रस्त फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 09:27 IST2016-10-20T15:35:17+5:302016-10-21T09:27:25+5:30

बॉलिवूड सितारे आणि वादग्रस्तता हे जणू समीकरणच बनून गेलंय. आपणास कदाचित तो किस्साही आठवत असेल, ज्यामध्ये मधू सप्रे आणि ...

The controversial photoshoot of Bollywood artists | बॉलिवूड कलाकारांचे वादग्रस्त फोटोशूट

बॉलिवूड कलाकारांचे वादग्रस्त फोटोशूट

लिवूड सितारे आणि वादग्रस्तता हे जणू समीकरणच बनून गेलंय. आपणास कदाचित तो किस्साही आठवत असेल, ज्यामध्ये मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांनी एका मासिकाच्या मुखपृष्ठावर नग्न अवस्थेत एका जाहिरातीसाठी फोटोशूट केले होते. त्यावेळी ते लोकांच्या पचनी पडले नव्हते. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. काही दिवसांपूर्वी ऐ दिल है मुश्कील या चित्रपटात ऐश्वर्या रॉय आणि रणबीर यांच्यातील इंटीमेट सीनचे फोटो प्रसिद्ध झाले होते, त्यावरुनही चर्चा झाली. कॉन्ट्रॉव्हर्सिअल फोटोशूट अधूनमधून होताना दिसते. काहींच्या मते तो प्रसिद्धीसाठीचा स्टंट असतो, तर काहींसाठी पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठीची शिडी. बॉलिवूडमधील अशाच काही कॉन्ट्रॉव्हर्सिअल फोटोशूटची माहिती या ठिकाणी देत आहोत.



ऐश्वर्या रॉय
अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि रणबीर कपूर यांचे फोटोज ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी खूप गाजले. ऐश्वर्याचे सासरे अमिताभ यांनीही यावर नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. हा चित्रपट प्रदर्शित होईल किंवा नाही याची अद्याप खात्री नसली तरी ऐश्वर्या आणि रणबीर यांच्या इंटीमेट सीनच्या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा आहे.



सनी लिओनी
सनी लिओनी आणि वादग्रस्तता या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात असेच काहीसे आहे. तिचे प्रत्येक फोटो हॉट असतात आणि विशेषत: पुरुष वर्गाला आकर्षित करुन घेण्यासाठीच असतात असाच काहीसा प्रघात आहे. जिस्म २ या चित्रपटाच्या पोस्टरसाठी तिने अभिनेता रणदीप हुडासोबत फोटो शूट केले होते. अर्थातच चित्रपट किती चालला हे माहिती नसले तरी सनीला याचा फायदा झाला हे मात्र नक्की.



विद्या बालन
अभिनेत्री विद्या बालन ही सोज्वळ भूमिका करणारी आणि फारशी वादग्रस्ततेमध्ये नसणारी अभिनेत्री. विद्याने असेच एक फोटोशूट केले होते. त्यामध्ये तिचा संपूर्ण पाठमोरा भाग दिसतो आहे. या फोटोमध्ये ती खूप आकर्षक दिसली होती. विद्याच्या या फोटोशूटमुळे तिचाही अशा अभिनेत्रींच्या यादीत समावेश झाला, ज्यांनी अशा पद्धतीने फोटो काढले आहेत.



जॉन अब्राहम-उदिता गोस्वामी
अभिनेता जॉन अब्राहम हा आपल्या मसल्स आणि बॉडीमुळे इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा वाटतो. बºयाचवेळा त्याने शर्टलेसही फोटो शूट केले आहेत. अभिनेत्री उदिता गोस्वामी सोबतचा त्याचा फोटो एकेकाळी खूप गाजला. 



बिपाशा बासू
बिपाशा ही पूर्वीपासूनच तिच्या हॉटनेसबाबत चर्चेत होतीच. वेगवेगळ्या जाहिरातींमधूनही तिने हे सिद्ध केले आहे. परदेशातील एका जाहिरातीमध्ये बिपाशा अर्धनग्न अवस्थेत अंघोळ करताना दिसून आली होती. त्यावेळी बिपाशाच्या या फोटोजची चर्चा माध्यमातून झाली होती. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यासोबत तिने केलेला ‘किस’ हा देखील फोटोच्या माध्यमातून खूप गाजला.



कंगना राणौत
आपल्या करिअरच्या सुरुवातीला कंगनाने अनेक जाहिराती केल्या. त्याशिवाय काही चित्रपट मासिकांच्या कव्हर फोटोसाठी शूट केले. असाच एक मासिकासाठी काढलेला फोटो खूप गाजला होता. त्याशिवाय तिने आणखी एका मासिकासाठी धूम्रपान करताना आणि मद्यपान करतानाचे फोटो शूट केले होते, ते देखील खूप गाजले.



पूजा भट्ट
महेश भट्ट यांची थोरली कन्या पूजा भट्टने एका मासिकासाठी असाच एक वादग्रस्त फोटो शूट केला होता. यामध्ये तिने संपूर्ण शरीराला ड्रेस दिसेल अशा पद्धतीने रंगविले होते. त्यावेळीही या छायाचित्राचा खूप वाद निर्माण झाला होता. आपले वडील महेश भट्ट यांच्यासोबत किस करतानाचाही तिचा फोटो गाजला.



दीपिका पादुकोन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मालक सिद्धार्थ मल्ल्यासोबत दीपिकाचे पूर्वी प्रेमप्रकरण होते. या टीमच्या एका सामन्यादरम्यान हे दोघे किस करताना आणि एकमेकांना मिठ्ठ्या मारताना दिसले होते. त्यावेळीही दीपिकाच्या रिलेशनशीपसंदर्भात चर्चा झाली होती.

Web Title: The controversial photoshoot of Bollywood artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.