Confirm : ‘गोलमाल अगेन’मध्ये तब्बूनंतर परिणिती चोपडाही पाजणार कॉमेडीचे डोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 14:51 IST2017-02-03T09:21:46+5:302017-02-03T14:51:46+5:30

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या तुफान कॉमेडी ‘गोलमाल’ सिरिजच्या ‘गोलमाल अगेन’मध्ये बरेचसे नवे चेहरे दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच तब्बूचे नाव ...

Confirm: 'Golmaal Again', Parineeti Chopra will do a Dummy Comedy | Confirm : ‘गोलमाल अगेन’मध्ये तब्बूनंतर परिणिती चोपडाही पाजणार कॉमेडीचे डोज

Confirm : ‘गोलमाल अगेन’मध्ये तब्बूनंतर परिणिती चोपडाही पाजणार कॉमेडीचे डोज

ग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या तुफान कॉमेडी ‘गोलमाल’ सिरिजच्या ‘गोलमाल अगेन’मध्ये बरेचसे नवे चेहरे दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच तब्बूचे नाव पुढे आल्यानंतर आता परिणिती चोपडाही कॉमेडीचे डोज पाजणार आहे. अर्थात काही स्टारकास्ट ही कायम असून, दोन-तीन नवे चेहरे प्रेक्षकांना हसून-हसून लोटपोट करण्यास सज्ज आहेत.



गोलमालच्या आतापर्यंतच्या तीन्ही भागात अजय देवगण, अरशद वारसी आणि तुषार कपूर झळकले आहेत. गोलमाल अगेनमध्येही हे तीघे कायम असणार आहेत. तर त्यांच्यासोबत परिणिती चोपडा, तब्बू आणि कुणाल खेमू दिसणार आहेत. गोलमालच्या दूसºया आणि तिसºया सिरिजमध्ये करिना कपूर कॉमेडी करताना बघावयास मिळाली. मात्र नुकतीच ‘आई’ झालेल्या करिनाच्या जागी आता परिणिती आणि तब्बूला संधी दिली गेली आहे. 



बॉलिवूड ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श याने एक ट्विटच्या माध्यमातून या सिनेमाची संपुर्ण स्टारकास्ट घोषित केली आहे. ‘दृश्यम’नंतर अजय देवगणसोबत तब्बूही गोलमालमध्ये दिसणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. या अगोदरही तब्बू आणि अजयने ‘विजयपथ’मध्ये स्क्रीन शेअर केली आहे. याविषयी बोलताना तब्बूने म्हटले की, अजय माझा चांगला मित्र आहे. शिवाय सिनेमातील इतर कास्टलाही मी चांगले ओळखते. मित्रांसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच मजेशीर राहिला आहे. शिवाय मी रोहितच्या या सिरीजची मी फॅन असून, त्यामध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले. 



पुढे बोलताना तब्बू म्हणाली की, जेव्हा मला या सिनेमाची आॅफर आली तेव्हा मला याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. बºयाचशा लोकांचा मी कॉमडी करू शकणार नाही असा समज आहे. परंतु जे लोक मला ओळखतात, त्यांना माहित आहे की, मी किती फनी आहे. तर परिणितीनेही गोलमालमध्ये काम करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मी कॉमेडी करण्यास अन् लोकांना लोटपोट करण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे. आता या दोघी कॉमेडीचा कसा तडका लावतील हे लवकरच समजेल. 

Web Title: Confirm: 'Golmaal Again', Parineeti Chopra will do a Dummy Comedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.