संगीतकार विशाल दादलानी देणार पत्नी प्रियालीला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 15:04 IST2017-01-30T09:34:31+5:302017-01-30T15:04:31+5:30
कितने अजीब रिश्ते है यहा पे हे गाणे बॉलिवूडमधील नात्यांसाठी तंतोतत जुळते. बॉलिवूडमध्ये ब्रेकअप करणे अथवा घटस्फोट घेणे यात ...
संगीतकार विशाल दादलानी देणार पत्नी प्रियालीला घटस्फोट
क तने अजीब रिश्ते है यहा पे हे गाणे बॉलिवूडमधील नात्यांसाठी तंतोतत जुळते. बॉलिवूडमध्ये ब्रेकअप करणे अथवा घटस्फोट घेणे यात काही नवीन नाही. गेले वर्षं हे ब्रेकअपचेच होते असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अरबाज खान आणि मलायका खान, फरहान अख्तर - अधुना भाबानी, पुलकित सम्राट - श्वेता रोहिरा यांसारख्या जोड्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या वर्षभरात आपल्याला ऐकायला मिळाल्या. यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला संगीतकार, गायक हिमेश रेशमियाचीदेखील घटस्फोटाची बातमी प्रसारमाध्यमात गाजली. हिमेशने त्याची पत्नी कोमलला नुकताच घटस्फोट द्यायचा ठरवला आणि आता या घटस्फोटीतांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. संगीतकार विशालने पत्नी प्रियालीला घटस्फोट देण्याचे ठरवले आहे.
विशाल आणि प्रियाली गेल्या कित्येक महिन्यांपासून वेगळे राहात आहेत आणि आता त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विशालने एक स्टेटमेंट दिले असून त्याने त्यात म्हटले आहे की, मी आणि प्रियाली गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहात आहोत. आता मी आणि प्रियालीने घटस्फोट घेण्याचा विचार केला आहे. ही आमच्या दोघांची वैयक्तिक बाब असल्याने याबाबत मी जास्त काही बोलू इच्छित नाही. आम्ही दोघे वेगळे झाल्यापासून आम्ही पहिल्यापेक्षा एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स झालो आहोत. आमच्या दोघांचे कुटुंब एकमेकांच्या खूप जवळचे आहे. तसेच ते आयुष्यभर राहील. आमच्या दोघांच्याही वैयक्तिक आयुष्याबाबत मीडियाने प्रायव्हसी बाळगावी.
विशाल आणि प्रियालीच्या लग्नाला अनेक वर्षं झाली आहेत. त्यांचे नाते घट्ट असल्याचे सगळ्यांनाच वाटत होते. त्यामुळे ही बातमी ऐकून इंडस्ट्रीतील सगळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.