बाजारात लसूण विकणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का? नेटकरी म्हणाले, "काय वेळ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 09:34 AM2023-08-28T09:34:50+5:302023-08-28T09:35:26+5:30

त्याला बघून कोणी ओळखलंही नाही की...

comedy actor sunil grover seen selling garlic in the market netizens says join kapil sharma everything will be alright | बाजारात लसूण विकणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का? नेटकरी म्हणाले, "काय वेळ..."

बाजारात लसूण विकणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का? नेटकरी म्हणाले, "काय वेळ..."

googlenewsNext

अनेकदा कलाकार अगदी साध्या वेशात बाहेर पडतात तेव्हा त्यांना ओळखणंही कठीण होतं. कधी शूटच्या निमित्ताने तर कधी सामान्यांसारखं ते फिरतात. नुकताच एक अभिनेता चक्क लसूण विकताना दिसला. त्याला बघून कोणी ओळखलंही नाही की हा तर मोठा सेलिब्रिटी आहे. इतकंच नाही तर त्याने रिक्षाही चालवली. कोण आहे हा अभिनेता?

आपण अनेक कलाकारांचे असे फोटो पाहतो ज्यामध्ये त्यांचा लुक बदललेला असतो. शूटच्या निमित्ताने ते असा लूक करुन रस्त्यावर येतात तेव्हा त्यांना कोणी ओळखूही शकत नाही. अगदी खुद्द बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनही लुक बदलून रस्त्याच्या कडेला बसलेले असा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. आता फोटोत दिसणारा हा अभिनेताही चक्क लसूण विकताना दिसतोय. वजन करुन मोजूनमापून तो लसूण भरत आहे. त्याने स्वत: इन्स्टाग्राम अकाऊंटवर तसा व्हिडिओही पोस्ट केला आहे.'हमरी अटरिया' असं कॅप्शनही त्याने दिलं आहे. तो अगदी सामान्यांप्रमाणे बाजारात बसून लसूण विकत आहे. 

तर हा अभिनेता आहे कॉमेडी किंग सुनील ग्रोवर (Sunil Grover). 'द कपिल शर्मा' शो मधून सर्वांना डॉ गुलाटी असो किंवा गुत्थी बनून सर्वांना खळखळून हसवणाऱ्या सुनीलचे नेहमीच काही ना काही हटके पोस्ट असतात. सुनीलच्या याच साधेपणावर चाहते फिदा असतात.'कपिल शर्मा जॉईन कर सगळं ठीक होईल' अशी मजेशीर कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

Web Title: comedy actor sunil grover seen selling garlic in the market netizens says join kapil sharma everything will be alright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.