विराटचे इन्स्टाग्रामवर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:43 IST2016-02-05T02:13:19+5:302016-02-05T07:43:19+5:30
भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली याची मैदानावरील कामगिरी सध्या जबरदस्त होत आहे. आॅस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत त्याने ...

विराटचे इन्स्टाग्रामवर कमबॅक
भ रतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली याची मैदानावरील कामगिरी सध्या जबरदस्त होत आहे. आॅस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत त्याने अफलातून फलंदाजी करीत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. याच काळात त्याच्या पर्सनल लाईफमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा होती. विराट आणि त्याची हॉट गर्ल फ्रेंड अनुष्का शर्मा यान हे ब्रेक अप झाल्याची चर्चा जोरात होती. मात्र दोघांनीही यावर बोलणे टाळले होते. याचदरम्यान दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो कले होते. शिवाय तांत्रिक कारण पुढे करीत विराटने आपले इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले. यामुळे या कपल बद्दलच्या अफवांना उत आला होता. याला काही काळ लोटल्यानंतर विराट ने पुन्हा इन्स्टाग्रामवर कम बॅक केले आहे. भारताने टी-२०मालिकेत कांगारुंचा सफाया केल्यानंतर विराटने सहकाºयांसोबत काढलेला एक फोटो शेयर केला आहे. ‘मी इन्स्टाग्रामवरील कॉउंट रद्द केल्यानंतर माज्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. आता मात्र मी परत आलोय,’ असे विराट म्हणाला.
