या मराठी चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसू शकते करिना कपूर खान..जाणून घेण्यासाठी क्लिक करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 17:07 IST2018-02-26T11:37:17+5:302018-02-26T17:07:17+5:30

करिना कपूर खान अनेक दिवसांपासून चित्रपटापासून लांब आहे. प्रेग्नेंसी दरम्यान तिने चित्रपटात काम करणे बंद केले होते. पण 'वीरे ...

Click here to know about Kareena Kapoor Khan in the remake of this Marathi film | या मराठी चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसू शकते करिना कपूर खान..जाणून घेण्यासाठी क्लिक करा

या मराठी चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसू शकते करिना कपूर खान..जाणून घेण्यासाठी क्लिक करा

िना कपूर खान अनेक दिवसांपासून चित्रपटापासून लांब आहे. प्रेग्नेंसी दरम्यान तिने चित्रपटात काम करणे बंद केले होते. पण 'वीरे दि वेडिंग' मधून ती चित्रपटात पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. या  चित्रपटात करिना कपूर बरोबर सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया सुद्धा दिसणार आहे
आता नवीन बातमी अशी आहे की करीना कपूर लवकरच एक नवीन प्रोजेक्ट हातात घेणार आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार करिना कपूर नुकतीच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर भेटून गेली आहे. ते दोघेजण आशुतोषच्या नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात भेटले होते. आशुतोषला करिना कपूरला त्याच्या चित्रपटासाठी साइन करायचे आहे.

आशुतोष मराठी चित्रपट 'आपला माणूस' चा हिंदी रिमेक बनवण्याच्या तयारीत आहे. त्यातील मुख्य भूमिकेसाठी तो करिना कपूरला साइन करु इच्छितो. रिपोर्टनुसार करिनाला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली असून ती लवकरच ह्या चित्रपटाला होकार कळवणार आहे. 

आपला माणूस हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. अजय देवगण निर्मित हा चित्रपट सतीश राजवाडेने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात नाना पाटेकर, इरावती हर्षे आणि सुमित राघवन मुख्य भुमिकेत होते. अजय देवगण निर्मित हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

ALSO READ :  बेस्ट फ्रेंड मलाइका अरोराने साधला करिना कपूरवर निशाणा, वाचा सविस्तर!

चित्रपटची गोष्ट एक वडिल मुलगा आणि सून ह्याच्या नात्यावर आधारित आहे. सुनेमुळे आपले आणि आपल्या मुलाचे नाते दुरावत चालले आहे असे वडिलांना वाटत असते. त्याउलट मुलगा सून आणि वडील ह्याचे नाते जुळण्याच्या प्रयत्नात असतो पण गोष्टी तेव्हा बदलते जेव्हा वडील बाल्कनी मधून पडून कोमा मध्ये जातात, मुलाला आणि सुनेला वाटते हा अपघात आहे पण पुलीस इन्स्पेक्टर ला सुरवातीला वाटते हीआत्महत्या आहे नंतर वाटते हा खून आहे ह्यात मुलाची भूमिका सुमित राघवनने केली आहे आणि पोलिसाची भूमिका नाना पाटेकरने केली आहे.

Web Title: Click here to know about Kareena Kapoor Khan in the remake of this Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.