चंकी पांडेच्या जुन्या हिट गाण्यांवर अनन्याचा डान्स, बापलेकीच्या परफॉर्मन्सने आणली धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 09:29 IST2025-05-19T09:28:30+5:302025-05-19T09:29:07+5:30

बापलेकीचा डान्स पाहून लोकांनी टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट केला.

chunky panday and ananya panday dance performance going viral on social media | चंकी पांडेच्या जुन्या हिट गाण्यांवर अनन्याचा डान्स, बापलेकीच्या परफॉर्मन्सने आणली धमाल

चंकी पांडेच्या जुन्या हिट गाण्यांवर अनन्याचा डान्स, बापलेकीच्या परफॉर्मन्सने आणली धमाल

अभिनेता चंकी पांडे (Chunky Panday) आणि लेक अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा डान्स व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. नुक्त्याच झालेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात अनन्या पांडेने वडिलांच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स करत एकप्रकारे ट्रिब्युटच दिलं. इतकंच नाही तर शेवटी चंकी पांडेलाही स्टेजवर आणण्यात आलं. हे अभिनेत्यासाठी सरप्राईजच होतं. बापलेकीचा डान्स पाहून लोकांनी टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट केला.

चंकी पांडेने १९८७ साली 'आग ही आग' सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून अनेक सिनेमांमध्ये काम केलं. नंतर चंकी विनोदी भूमिकांमध्ये रमले. १९८८ साली आलेल्या 'पाप की दुनिया' या सिनेमातील 'मै तेरा तोता, तू मेरी मैना' हे त्यांचं गाणं खूपच गाजलं होतं. यामध्ये चंकीसोबत नीलम कोठारी होती. नुकतंच अनन्याने अवॉर्ड सोहळ्यात या गाण्यावर डान्स केला. तसंच चंकीच्या इतरही काही सुपरहिट गाण्यांवर नृत्य सादर करत तिने वडिलांना ट्रिब्युट दिलं. परफॉर्मन्सच्या शेवटी चंकी पांडेलाही स्टेजवर बोलवण्यात आलं. बापलेकीने डान्स करत मस्त धमाल आणली. लेक आपल्याच जुन्या गाण्यांवर परफॉर्म करणार आहे हे चंकीसाठी सरप्राईजच होतं. बापलेकीचा हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


'बापलेकीची जबरदस्त केमिस्ट्री','कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण','किती क्युट' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. चंकी पांडे इतक्या वर्षांनी स्टेजवर धमाल करताना पाहून चाहते खूश झालेत. चंकीने 'आँखे','तेजाब','विश्वात्मा','आग ही आग','तिरछी टोपीवाले','गोला बारुद' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर आात त्यांची लेक अनन्या पांडे बॉलिवूड गाजवत आहे.

Web Title: chunky panday and ananya panday dance performance going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.