चंकी पांडेचा लेकीसोबत डान्स, 'सात समुंदर पार' गाण्यावर नाचले बापलेक, पण अनन्या का होतेय ट्रोल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:17 PM2023-03-17T12:17:46+5:302023-03-17T12:18:27+5:30

बॉलिवुड अभिनेता चंकी पांडेच्या घरी सध्या लग्नाची गडबड सुरु आहे.

chunkey pandey and ananya pande dance video viral | चंकी पांडेचा लेकीसोबत डान्स, 'सात समुंदर पार' गाण्यावर नाचले बापलेक, पण अनन्या का होतेय ट्रोल?

चंकी पांडेचा लेकीसोबत डान्स, 'सात समुंदर पार' गाण्यावर नाचले बापलेक, पण अनन्या का होतेय ट्रोल?

googlenewsNext

बॉलिवुडमध्ये अभिनेता चंकी पांडेच्या Chunky Pandey) घरी सध्या लग्नाची गडबड सुरु आहे. चंकी पांडेची पुतणी आणि अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे (Alanna Pandey) बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रीसह लग्नबंधनात अडकत आहे. अलानाचे प्रिवेडिंग फंक्शन्स सध्या धामधुमीत सुरु आहेत. काल पार पडलेल्या संगीत सोहळ्यासाठी अनेक बॉलिवुड कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान अनन्या आणि चंकी पांडेचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. बाप लेकीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

बॉलिवुड बबलने अनन्या पांडेचा (Ananya Pandey) हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दिव्या भारतीचे आयकॉनिक सॉंग 'सात समुंदर पार' या गाण्यावर अनन्या भाऊ अहानसोबत नाचताना दिसतेय. बहीण भावाचा हा व्हिडिओ चाहत्यांना फारच आवडलाय. यामध्ये अनन्या ठुमके लावत आहे. तर अहानही बहिणीच्या तालावर नाचत होता. यानंतर मध्येच चंकी पांडेची एंट्री होते. बापलेक एकदम ठसक्यात गाण्यावर ताल धरतात. मुलीसोबत ठुमके लावताना चंकी पांडे चा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. या बापलेकीच्या जोडीवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

कोणी क्युट तर कोणी सुपर्ब हिरो अशा कमेंट व्हिडिओवर केल्या आहेत. तसंच तर आर्यन खान कुठे आहे असं विचारत काही नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोलही केलं आहे. शिवाय काही नेटकऱ्यांना अनन्याचा डान्स अजिबात आवडलेला नाही. इतकंच काय तर हिला कोणीतरी साडी कशी नेसायची ते शिकवा असा सल्ला दिला आहे. या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

Web Title: chunkey pandey and ananya pande dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.