धनश्री वर्मा ठरली लोकमत डिजिटल मोस्ट एंगेजिंग कोरियोग्राफर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 20:09 IST2023-02-22T20:05:33+5:302023-02-22T20:09:19+5:30
धनश्री ही प्रसिद्ध यूट्यूब स्टार आहे. नृत्य, एक्स्प्रेशन आणि कोरिओग्राफीमुळे ती सोशल मीडियावर जास्त प्रसिद्ध आहे.

धनश्री वर्मा ठरली लोकमत डिजिटल मोस्ट एंगेजिंग कोरियोग्राफर, म्हणाली...
मुंबईत मोठ्या दिमाखात लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सचा सन्मान करण्यात आला. यावेळी धनश्री वर्मा ठरली मोस्ट एंगेजिंग कोरियोग्राफर अवॉर्डची मानकरी ठरली. धनश्री ही प्रसिद्ध यूट्यूब स्टार आहे. नृत्य, एक्स्प्रेशन आणि कोरिओग्राफीमुळे ती सोशल मीडियावर जास्त प्रसिद्ध आहे. धनश्री वर्माने अवॉर्ड स्विकारल्यानंतर लोकमतचं विशेष आभार मानले. काही दिवसांपूर्वीचं धनश्रीची सर्जरी झाली त्यामुळे हे अवॉर्ड तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं ती म्हणाली.
धनश्री सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ५ लाखाहुन अधिक फॉलोवर्स आहेत. ती वेळोवेळी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. धनश्रीचा डान्सशी संबंधित एक युट्युब चॅनल आहे.
तिचे तब्बल २५ लाख सब्स्क्रायबर्स आहेत. ती बॉलीवूडच्या गाण्यांना रीक्रिएट करते. तसेच ती हिपहॉपची ट्रेनिंगसुद्धा देते. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा खूप चर्चित कपल आहे. त्यांनी २०२० च्या डिसेंबर महिन्यात विवाह केला होता.