या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 19:06 IST2022-01-24T18:58:57+5:302022-01-24T19:06:23+5:30

फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या सात मुलींपैकी एक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्ही ओळखू शकता का?

Childhood photo of her school days do you recognize her | या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

वरील फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या सात मुलींपैकी एक मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्हाला ओळखता येत आहे का? नाही....? चला तर मग आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ही बॉलिवूड अभिनेत्री तिच्या फिटनेससाठी खूप चर्चेत आहे, इतकेच नाही तर अलीकडेच या अभिनेत्रीने अनेक वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे आणि सध्या ती एका शोला जज करत आहे.

खरं तर, या सात मुलींमध्ये टॉप लाईनच्या मध्यभागी उभी असलेली मुलगी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. हा थ्रोबॅक फोटो स्वत: शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या शाळेतील मैत्रिणीसोबत उभी आहे. या फोटोमध्ये शिल्पानेही पांढऱ्या रंगाचा शाळेचा ड्रेसमध्ये ती कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहे.

आज जागतिक शिक्षण दिनानिमित्त हा फोटो शेअर करत शिल्पाने या फोटोला एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. शिल्पा सध्या इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये जज म्हणून येत आहे. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी शिल्पा तिचा पती राज कुंद्रामुळे खूप वादात सापडली होती. शिल्पा शेट्टीने व्यावसायिक राज कुंद्रासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर राज कुंद्रानेही तिच्या नावावर काही संपत्ती केल्या आहेत. इतकेच काय तर राज कुंद्राच्या काही कंपनीची शिल्पा शेट्टीही मालकीण आहे. शिल्पा आणि राज यांना दोन मुले देखील आहेत, ज्यांची नावे वियान आणि समिशा आहेत. शिल्पा शेट्टीही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे.

Web Title: Childhood photo of her school days do you recognize her