आईच्या कुशीत बसलेला हा चिमुकला बॉलिवूडवर करतो राज्य, ओळखलंत का त्याला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 17:57 IST2021-12-20T17:56:15+5:302021-12-20T17:57:28+5:30

हा क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि तो पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत. हा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो कुणाचा, तुम्ही सांगू शकाल?

this child sitting in mother lap has become heartbeat of bollywood this is salman khan | आईच्या कुशीत बसलेला हा चिमुकला बॉलिवूडवर करतो राज्य, ओळखलंत का त्याला?

आईच्या कुशीत बसलेला हा चिमुकला बॉलिवूडवर करतो राज्य, ओळखलंत का त्याला?

आपल्या आवडत्या बॉलिवूड स्टारबद्दल जाणून घ्यायला कोणाला आवडत नाही? विशेषत: आपला आवडता स्टार बालपणी कसा दिसायचा हे पाहायला बॉलिवूड लव्हर्स कायम उत्सुक असतात. तूर्तास एका बड्या स्टार्सचा बालपणीचा असाच एक क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि तो पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत. आईच्या कुशीत बसलेला हा स्टार आज बॉलिवूडवर राज्य करतो. हा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो कुणाचा, तुम्ही सांगू शकाल?

या व्हायरल फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. तो कोण हे ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही अद्यापही या स्टारला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो.

तर हा स्टार दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा दबंग खान आहे. होय, सलमान खान (Salman Khan). दीड-दोन वर्षांचा असतानाचा त्याचा हा फोटो आहे. हा चिमुकला एकदिवस इंडस्ट्रीवर राज्य करेल, असा विचारही तेव्हा कुणी केला नसावा.  बॉलिवूड लाऊड स्पीकर नावाच्या युट्यूब चॅनलने सलमानचा हा बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे.

सलमानचे वडील बॉलिवूडचे मोठे लेखक होते. पण म्हणून सलमानला सहज यश मिळालं नाही. यासाठी त्यानं मोठा संघर्ष केला. खरं तर सलमानला सुरूवातीला दिग्दर्शक बनायचं होतं. तो आपली स्क्रिप्ट घेऊन अनेकांकडे गेला. पण त्याला संधी मिळाली नाही. यानंतर ‘बीवी हो तो ऐसी’ हा सिनेमा त्याला ऑफर झाला. पण यात त्याला साईड हिरोचा रोल दिला गेला. त्याने तो स्वीकारला. यानंतर त्याचा ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला आणि सलमानच्या या सिनेमानं कमाल केली.

आज सलमान 55 वर्षांचा आहे. पण या वयातही इंडस्ट्रीत त्याचा दबदबा आहेत. त्याच्याकडे आजही सिनेमांच्या रांगा लागल्या आहेत. लवकरच सलमानचा ‘टायगर 3’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शिवाय आजच सलमानने ‘बजरंगी भाईजान’च्या सीक्वलची घोषणा केलीये.

Web Title: this child sitting in mother lap has become heartbeat of bollywood this is salman khan