मुख्यमंत्री, शाहरुख खानसह 'या' मान्यवरांनी घेतले दिलीपकुमार यांचे अंतिम दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 09:20 IST2021-07-08T09:18:28+5:302021-07-08T09:20:26+5:30

शाहरूख खान नियमितपणे दिलीपकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी जात. सायरा बानो यांचीही ते आईप्रमाणे काळजी घेतात.

The Chief Minister, Shah Rukh Khan and other dignitaries paid their last respects to Dilip Kumar | मुख्यमंत्री, शाहरुख खानसह 'या' मान्यवरांनी घेतले दिलीपकुमार यांचे अंतिम दर्शन

मुख्यमंत्री, शाहरुख खानसह 'या' मान्यवरांनी घेतले दिलीपकुमार यांचे अंतिम दर्शन

मुंबई :  ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेते आणि सिनेकलाकारांचा समावेश होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर सायरा बानो यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री नवाब मलिक, छगन भुजबळ, पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, अमिन पटेल, बाबा सिद्दिकी यांनीही अंत्यदर्शन घेत सायरा बानो यांचे सांत्वन केले. धर्मेंद्र, सुभाष घई, अनुपम खेर, शबाना आझमी, अनिल कपूर, रझा मुराद, शक्ती कपूर, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, करण जोहर, रणबीर कपूर यांच्यासह अनेक  कलाकारांनी दिलीपकुमार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले . 

शाहरूख खान येताच सायरा बानो झाल्या भावुक
शाहरूख खान नियमितपणे दिलीपकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी जात. सायरा बानो यांचीही ते आईप्रमाणे काळजी घेतात. बुधवारी शाहरूख खान अंत्यदर्शनासाठी दाखल होताच सायरा बानो यांच्या अश्रूंचा बांध फुटला. शाहरूखच्या खांद्यावर डोके ठेवून त्यांनी आपल्या आसवांना मोकळी वाट करून दिली. त्यांच्या हुंदक्यांमुळे शाहरूखलाही अश्रू अनावर झाले.
 

Web Title: The Chief Minister, Shah Rukh Khan and other dignitaries paid their last respects to Dilip Kumar