'या जखमा मी का लपवू?..'; ब्रेस्ट सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवल्या शस्त्रक्रियेच्या खुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 12:38 IST2022-06-14T12:37:03+5:302022-06-14T12:38:17+5:30

Chhavi mittal: कर्करोगावर मात करत असताना छवीला अनेक वेदनादायक शस्त्रक्रियांमधून जावं लागलं. या कठीण काळातील प्रवास तिने वेगवेगळ्या पोस्टमधून शेअर केला आहे.

chhavi mittal flaunts cancer scar after surgery says she proud to be cancer survivor | 'या जखमा मी का लपवू?..'; ब्रेस्ट सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवल्या शस्त्रक्रियेच्या खुणा

'या जखमा मी का लपवू?..'; ब्रेस्ट सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवल्या शस्त्रक्रियेच्या खुणा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लोकप्रिय अभिनेत्री छवी मित्तल हिची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच छवीने कॅन्सरसारख्या असाध्य आजारावर मात केली आहे. छवीला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. मात्र, या आजारावर मात करत ती आता तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत आहे. तसंच कर्करोगग्रस्त पिडितांचं मनोबल वाढवणाऱ्या पोस्टही वरचेवर शेअर करत आहे. यामध्येच छवीने एक फोटो शेअर करत तिच्या शस्त्रक्रियेच्या खुणा दाखवल्या आहेत.

कर्करोगावर मात करत असताना छवीला अनेक वेदनादायक शस्त्रक्रियांमधून जावं लागलं. या कठीण काळातील प्रवास तिने वेगवेगळ्या पोस्टमधून शेअर केला आहे. मात्र, यावेळी तिने एक फोटो पोस्ट करत शस्त्रक्रियेच्या खुणा दाखवल्या आहेत. तसंच एक भावनिक पोस्टदेखील लिहिली आहे.

छवीने तिचा एक पाठमोरा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या पाठीवर शस्त्रक्रियेच्या काही खुणा दिसून येत आहेत. "खूण. माझ्या शरीरावर तुम्हाला दिसतच असेल. परंतु, काही जणांना या खुणा दिसायच्या नाहीत. आता कुठे मला या खुणांकडे पाहण्याची हिंमत होत आहे. पण, काही जणांनी या खुणांकडे पाहून आश्चर्य व्यक्त केलं. मात्र, या खुणाच मला माझ्या संघर्षाची आठवण करुन देतात जी लढाई मी लढली आहे", असं छवी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी का या खुणा लपवायचा प्रयत्न करु. जर मी असलं केलं तर त्या संघर्षाच्या आठवणींसोबत छेडछाड केल्यासारखं होईल." दरम्यान, काही दिवसांपूर्वीच छवीची ब्रेस्ट कॅन्सरवर सर्जरी झाली. या संपूर्ण प्रवासात तिने अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट दिले होते. विशेष म्हणजे तिने हॉस्पिटलमधील एक  व्हिडीओदेखील पोस्ट केला होता.

Web Title: chhavi mittal flaunts cancer scar after surgery says she proud to be cancer survivor