विनामेकअप अशी दिसते ही बॉलिवूड अभिनेत्री, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 18:56 IST2020-07-03T18:54:34+5:302020-07-03T18:56:54+5:30
बॉलिवूडमध्ये भूमीने २०१४ साली 'दम लगा के हईशा' चित्रपटातून पदार्पण केले आहे. तिने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा तिचे वजन ९० किलो होते.

विनामेकअप अशी दिसते ही बॉलिवूड अभिनेत्री, फोटो व्हायरल
'टॉयलेट एक प्रेमकथा' तसेच 'शुभ मंगल सावधान' सिनेमातून लोकप्रिय ठरलेली भूमी पेडणेकरच्या प्रत्येक अंदाजावर चाहते फिदा होतात. ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इतर अभिनेत्रींप्रमाणे आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत तिच्या अनेक फोटोंवर दिसून येते. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
अशातच सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तिने अजिबात मेकअप केलेला नाही. त्यामुळे सा-यांनीच नॅचरल ब्युटी म्हणत तिचे कौतुकच केले आहे. ऑनस्क्रीन लूकप्रमाणे रिअल लाईफ लूकलाही रसिकांनी भरघोस पसंती दिली आहे.
बॉलिवूडमध्ये भूमीने २०१४ साली 'दम लगा के हईशा' चित्रपटातून पदार्पण केले आहे. तिने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा तिचे वजन ९० किलो होते. मात्र आता ती फिट झाली असून दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते आहे. याबाबत भूमी म्हणाली की, मी साईज किंवा रंगामुळे कधीच स्वतःला कमी लेखलं नाही. मी स्वतःला नेहमीच सेक्सी समजलं आहे. ज्यावेळी माझे ९० किलो वजन होते त्यावेळी देखील स्वतःला आकर्षक समजत होते. त्यावेळी देखील मी छोटे कपडे परिधान करत होते आणि क्लीवेज दाखवताना देखील अनकंम्फर्टेबल समजत नव्हते.