"अँगल बदला, रंग नाही...", श्रद्धा कपूरने मारला टोमणा; व्हायरल झाली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:55 IST2025-02-10T11:54:51+5:302025-02-10T11:55:37+5:30

Shraddha Kapoor : 'स्त्री २'च्या यशानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे.

''Change the angle, not the color...'', Shraddha Kapoor taunted; Post went viral | "अँगल बदला, रंग नाही...", श्रद्धा कपूरने मारला टोमणा; व्हायरल झाली पोस्ट

"अँगल बदला, रंग नाही...", श्रद्धा कपूरने मारला टोमणा; व्हायरल झाली पोस्ट

'स्त्री २'च्या यशानंतर श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor)ची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. याच कारणामुळे ती सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच तिने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून ती कुणाला तरी टोमणे मारतेय असे वाटते आहे. 

श्रद्धा कपूर हिने तिचे दोन फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यातील एक फोटो सेल्फीच्या रूपात आहे, तर दुसऱ्या फोटोत ती तिच्या पाळीव कुत्र्यांसोबत मस्ती करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''अँगल बदला, रंग नाही.'' आता या कॅप्शनवरून ती हावभावातून कुणाला तरी टोमणे मारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण तिने कोणाचेही नाव लिहिलेले नाही. लोकांना हे मजेशीर कॅप्शन खूप आवडले आहे.


गेल्या महिन्यात, एक पोस्ट शेअर करताना श्रद्धा कपूरने तिच्या चाहत्यांना व्हॅलेंटाईन डे गिफ्टसाठी एक चांगली कल्पना सुचवली होती. तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली की, ''प्रत्येकाला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काहीतरी खास करायचे असते, आम्ही दिवाळी, रक्षाबंधन, बोर्डाच्या निकालानंतरही भेटवस्तू देतो. व्हॅलेंटाईन डेला आपण एक छान ब्रेसलेट का देऊ शकत नाही?.'' श्रद्धाने पुढे लिहिले की, “तुम्ही दररोज वापरता येणारी कोणतीही वस्तू गिफ्ट करू शकता. फक्त काहीही भेट द्या. मी तुम्हाला काही खरेदी करण्यासाठी तुमचे घर गहाण ठेवण्यास सांगत नाही."

"व्हॅलेंटाईन डेला मनापासून भेटवस्तू द्या."
श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कॅप्शन दिले होते, "व्हॅलेंटाइन डेला मनापासून भेटवस्तू द्या." याआधी श्रद्धा कपूरने एका पोस्टमध्ये सांगितले होते की ती इंस्टाग्राम जास्त का वापरत नाही. तिने तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती वाचत आहे.

वर्कफ्रंट
श्रद्धा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा 'धूम' फ्रँचायझीमध्ये एक चित्रपट आहे, ज्यामध्ये ती अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

Web Title: ''Change the angle, not the color...'', Shraddha Kapoor taunted; Post went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.