कपिल शर्मामुळे चंदूला मिळत नाहीये काम, शोमध्ये केला खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 17:14 IST2021-12-26T17:11:33+5:302021-12-26T17:14:19+5:30
चंदू चायवाला म्हणजेच चंदन प्रभाकरची सध्या तो 'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिलसोबत काम करतो.

कपिल शर्मामुळे चंदूला मिळत नाहीये काम, शोमध्ये केला खुलासा...
मुंबई: चंदू चायवाला म्हणजेच विनोदी अभिनेता चंदन प्रभाकर त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी खूप लोकप्रिय आहे. सध्या तो 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसतो. शोमध्ये अनेकदा चंदन आणि कपिलचे मजेशीर भांडण पाहायला मिळते. पण, आता कपिलमुळे आपल्याला काम मिळत नसल्याचा खुलासा चंदनने शोमध्ये केला आहे. पण, त्याचा हा खुलासा शोमधील एका अॅक्टचा भाग आहे. या शोचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चंदन आणि कपिल एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
कपिलमुळे काम मिळत नाही
नुकताच शोमध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर त्यांचा आगामी चित्रपट 'जर्सी'च्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. या एपिसोडचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चंदन प्रभाकर कपिलला सांगतो, माझ्याशी बोलण्यापूर्वी विचार कर की मी आता जुना चंदू नाही. त्यावर कपिल म्हणतो, तू आता प्रिन्स चार्ल्सच्या घरात कुक झाला का? त्यावर चंदन म्हणतो की, मी केटी पेरीच्या घरात काम करतोय.
त्यावर कपिल म्हणतो की, तू कधी ब्लू बेरी खालली नाही, तुला केटी पेरी कुठे मिळाली ? यादरम्यान चंदन म्हणतो की, भारतात मला काम कुठून मिळेल, सगळी कामे कपिलला मिळत आहेत. नेटफ्लिक्स हा करतोय, चित्रपट हा करतोय, शोपण हाच करतोय, मला कोण काम देणार ? यानंतर सगळे हसू लागतात.
या दिवशी प्रदर्शित होणार जर्सी
शाहीद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा चित्रपट 'जर्सी' 31 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिदने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. शाहिदचे वडील पंकज कपूर देखील या चित्रपटात आहेत, ते क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तेलुगू सुपरहिट चित्रपट 'जर्सी'चा हा हिंदी रिमेक आहे.