'चांदनी'ची अशी काय क्रेझ की तिची लागली बाहुली तर तिच्या सिनेमाच्या नावाने सर्व्ह केल्या जातात १०० डिशेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 14:31 IST2018-02-28T09:01:41+5:302018-02-28T14:31:41+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे सारेच शोकसागरात बुडालेत.त्यांच्या चित्रपटसृष्टी,फॅन्ससह कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळलाय.श्रीदेवी या हरहुन्नरी आणि अष्टपैलू अशा ...

'चांदनी'ची अशी काय क्रेझ की तिची लागली बाहुली तर तिच्या सिनेमाच्या नावाने सर्व्ह केल्या जातात १०० डिशेस
ह ंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे सारेच शोकसागरात बुडालेत.त्यांच्या चित्रपटसृष्टी,फॅन्ससह कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळलाय.श्रीदेवी या हरहुन्नरी आणि अष्टपैलू अशा नायिका होत्या.त्यामुळे लाडक्या 'चांदनी'ला अखेरचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटींसह सर्वसामान्यांची मोठी गर्दी उलळली आहे.बॉलिवूडचा हा सुंदर 'नगीना' काळाच्या पडद्याआड गेला आहे यावर कुणाचाही विश्वास बसत नाही.श्रीदेवी यांचा अभिनय,डान्स,कॉमेडी यावर रसिक अक्षरशा फिदा होते.हिंदीसह तमिळ,तेलुगू सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यामुळंच आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या अकाली जुदाईने कोट्यवधी फॅन्सवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.श्रीदेवी यांची रसिकांमध्ये प्रचंड क्रेझ होती.रसिकांनीच चांदनीला पहिली लेडी सुपरस्टार बनवलं.आपल्या लाडक्या अभिनेत्रीवरील प्रेमसुद्धा रसिक कधीच लपवू शकले नाहीत.त्यांची लोकप्रियता अशी आहे की भारताच्या विविध भागात त्यांच्या नावाने रेस्टाॅरंट उघडण्यात आलेत.मुंबईच्या सांताक्रुजमध्ये श्रीदेवीच्या नावाचे एक रेस्तरॉ सुरु करण्यात आलंय.चेन्नईतही श्रीदेवी यांच्या एका फॅनने त्यांच्या नावाचे एक रेस्टाॅरंट उघडले आहे.याची खासियत म्हणजे तिथे त्यांच्या 100 सिनेमांच्या नावाच्या डिश ठेवण्यात आल्या आहेत.यासोबतच हॉटेल समोर श्रीदेवीचे एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे.यासह भीमावरम, आंध्र प्रदेश,कल्याणमध्येही श्रीदेवी यांच्या नावाचे रेस्टाॅरंट आहे. त्यांचे फॅन्स भारतातच नाहीतर परदेशातही आहेत.याचीच झलक सिंगापूरमध्येही पाहायला मिळते.सिंगापुरच्या रेसकोर्स रोड इथल्या 'देल्ही रेस्टाॅरंट' मध्ये श्रीदेवीच्या नावाची बाहुली लावण्यात आली आहे.अशी ही अनोखी जादू श्रीदेवी यांच्या अभिनयात होती.त्यामुळेच कपूर कुटुंबीयांसह फॅन्सनाही त्यांच्या जाण्याचा धक्कापचवणं कठीण जात आहे.
श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले.आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय,सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता.त्यांनी सदमा, 'मिस्टर इंडिया','नागिन','लम्हें','इंग्लिश विंग्लिश','मॉम' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.