सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा ‘ब्रा लेस’ विरोध!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 16:30 IST2016-08-30T10:57:15+5:302016-08-30T16:30:55+5:30

‘बार बार देखो’मधील एका ‘ब्रा सीन’वर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने तो चित्रपटातून टाळला. बिग बॉस9 ची स्पर्धक राहिलेली प्रिया मलिक सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाविरोधात मैदानात उतरली. ‘ब्रा लेस’ होत प्रियाने सेन्सॉर बोर्डाचा निषेध केला.

Censor board's decision to 'bras' protest! | सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा ‘ब्रा लेस’ विरोध!!

सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा ‘ब्रा लेस’ विरोध!!

ार बार देखो’मधील एका ‘ब्रा सीन’वर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने तो चित्रपटातून टाळला. ‘बार बार देखो’च्या दिग्दर्शिका नित्या मेहरा यांनी याचा जोरदार निषेध केला. आता तर बिग बॉस9 ची स्पर्धक राहिलेली प्रिया मलिक ही सुद्धा सेन्सॉर बोर्डाविरूद्ध मैदानात उतरली. ‘ब्रा लेस’ होत प्रियाने सेन्सॉर बोर्डाचा निषेध केला. प्रियाने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला. यात तिने नाईटी घातलेली आहे. ‘Because wearing a visible# bra would be indecent’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. शिवाय या कॅप्शनसमोर ‘free the nipple’ हॅशटॅगही दिले आहे. 
‘बार बार देखो’मध्ये वुमेन लॉन्जरीवर आधारित अर्थात महिला अंतर्वस्त्राबद्दलचे एक दृश्य होते. शिवाय एका संवादात सविता भाभी(कॉमिक बुकमधील एक पॉर्न कॅरेक्टर)चा उल्लेख होता. सेन्सॉर बोर्डाने हा सीन व सविता भाभीबद्दलचा संवाद दोन्ही चित्रपटातून काढून टाकलेत. नित्या मेहरा यांनी याला तीव्र विरोध नोंदवला.
 सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला रिलीज होतो आहे.
 

Web Title: Censor board's decision to 'bras' protest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.