बाथटबमधील फोटोवर खोचक कॉमेण्ट करणाऱ्यांना सेलिना जेटलीने दिले चोख उत्तर; वाचा काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 18:22 IST2017-09-09T12:48:30+5:302017-09-09T18:22:10+5:30

खोचक कॉमेण्ट देणाºया युजर्सला सेलिना जेटलीने जशास तसे उत्तर दिले आहे. वाचा काय म्हटले सेलिनाने!

Celina Jaitley gave a good answer to the pitcher comitant on bathtub; Read what the episode! | बाथटबमधील फोटोवर खोचक कॉमेण्ट करणाऱ्यांना सेलिना जेटलीने दिले चोख उत्तर; वाचा काय आहे प्रकरण!

बाथटबमधील फोटोवर खोचक कॉमेण्ट करणाऱ्यांना सेलिना जेटलीने दिले चोख उत्तर; वाचा काय आहे प्रकरण!

लिवूडमधील बºयाचशा अभिनेत्रींच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. होय, सध्या परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, या अभिनेत्रीदेखील गर्भावस्थेचा काळ एन्जॉय करताना दिसत आहेत. काहींनी तर हे दिवस अविस्मरणीय ठरावेत म्हणून फोटोशूटही केले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोहा अली खान आणि ईशा देओल यांनी बेबी बम्पसह फोटोशूट केले. विशेष म्हणजे त्यांनी हे स्पेशल फोटोज् त्यांच्या चाहत्यांसोबत शेअरही केले. दुसºयांदा आई होत असलेल्या सेलिना जेटलीनेही असेच फोटो शेअर केले. परंतु युजर्सनी तिला या फोटोवरून चांगलेच फटकारले. सेलेनानेही टीकाकारांना जशास तसे उत्तर देत हे प्रकरण चांगलेच तप्त ठेवले आहे. 

सेलिनाने बाथटबमध्ये झोपलेल्या अवस्थेतील बेबी बम्प दाखवितानाचा एक फोटो शेअर केला होता. परंतु युजर्सना तिचा हा फोटो फारसा भावला नसल्याचे दिसून आले. त्यांनी सेलिनाला असे काही फटकारले की, काही क्षणातच फोटोला शेकडोंच्या संख्येने उलट-सुलट कॉमेण्ट आल्या. युजर्सच्या या कॉमेण्ट बघून अस्वस्थ झालेल्या सेलिनाने इन्स्टावर पुन्हा एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये ती खिडकीजवळ बसलेली दिसत आहे. तसेच तिने तिच्या बेबी बम्पला हातांनी कव्हर केल्याचे दिसून येत आहे. 
 

हा फोटो शेअर करताना सेलिनाने फोटोला खूपच लांबलचक असे कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले की, ‘नुकतेच मी माझा बाथटबमध्ये बेबी बम्प दाखवितानाचा एक फोटो शेअर केला होता. माझ्या या फोटोला अनेक लोकांकडून प्रेम आणि ब्लेसिंग्स मिळाल्या. मात्र याचदरम्यान फेसबुक आणि इन्स्टाग्राम जणूकाही या फोटोमुळे युद्धाचे मैदानच तयार झाले होते. त्यामुळे ट्रोल आणि लाइक माइंडेड युजर्समध्ये जणूकाही युद्धच पेटले होते. वास्तविक अशाप्रकारच्या कॉमेंट्सचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. तर अशा प्रकारच्या कॉमेण्ट देणाºयांवर मला हसू येते.’

Web Title: Celina Jaitley gave a good answer to the pitcher comitant on bathtub; Read what the episode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.