सेलिब्रिटींचा 'रसोई' फंडा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:17 IST2016-01-16T01:18:19+5:302016-02-06T13:17:07+5:30

          अक्षयकुमारचे रांगडे रूप पाहून तो स्वयंपाकघरात रमतो हे खरे वाटत नाही. हिरो म्हणून करिअरला ...

Celebrity's 'kitchen' fund! | सेलिब्रिटींचा 'रसोई' फंडा !

सेलिब्रिटींचा 'रसोई' फंडा !

 
      अक्षयकुमारचे रांगडे रूप पाहून तो स्वयंपाकघरात रमतो हे खरे वाटत नाही. हिरो म्हणून करिअरला सुरुवात करण्यापूर्वी अक्षय 'शेफ' म्हणून काम करत होता, हे बहुतेकांना माहीतच असेल. त्याच्या या आवडीपायीच त्याने 'मास्टर शेफ' हा स्टारप्लसचा कार्यक्रम होस्ट केला होता. थायी फुडचा फॅ न असलेला अक्षय 'थाई ग्रीन करी' उत्तमरित्या बनवतो. 'स्वप्नातही आपण लज्जतदार रेड सॉस पास्ता बनवू शकतो' असे अक्की मोठय़ा आत्मविश्‍वासाने सांगतो. चित्रपटसृष्टीत अजून काही वर्षे घालवल्यानंतर 'कुकिंग'च्या दुनियेत पुन्हा काहीतरी करण्याचा अक्षयचा मानस आहे. घरातच 'मास्टरशेफ' आहे म्हणल्यावर ट्विंकलबाईंची मजा असणार !! ६४ कलांपैकी एक असणार्‍या पाककलेची ज्यांना आवड आहे, फक्त त्यांनाच त्याचा निखळ आनंद घेता येतो. स्वयंपाक करणे त्यांच्यासाठी एक 'पॅशन' असते, आणि स्वयंपाकघर म्हणजे फुल टु धमाल करण्याचे ठिकाण. वाचून कदाचित आपल्याला आश्‍चर्य वाटेल पण 'डाएट प्लॅन'चे कटाक्षाने पालन करणारे आणि दिवसरात्र शूटिंगमध्ये व्यस्त असणारे बॉलिवूड स्टार्स पण फावल्यावेळात स्वयंपाकघरात रमतात बरं क ा !! यांपैकी तर काहीजणं उत्तम 'कुक' असून शूटिंगच्या वेळी स्वत: बनवलेल्या डिशेस ते सहकलाकारांसाठी सेटवर पण घेऊन जातात. चला तर मग पाहूया कोणाच्या किचनमध्ये काय आणि कसे शिजतेय ते..
ऐश्‍वर्या-अभिषेक बच्चन : या दोघांनाही स्वयंपाकाची अत्यंत आवड आहे. कॉलेज जीवनापासूनच स्वयंपाकघरात रमणार्‍या ऐश्‍वर्याला अनेक चविष्ठ पदार्थ बनवता येतात. पतीदेव अभिषेक बच्चन तर या विश्‍वसुंदरीने बनवलेल्या 'डेझर्ट'चे दिवाने आहेत.
ऐश्‍वर्याच्या पाककलेविषयी सांगताना अभिषेक म्हणाला की, नवीन लग्न झाले तेव्हा घरातल्या परंपरेनुसार ऐश्‍वर्याने सगळयांसाठी काहीतरी गोड बनवायचे होते. त्यावेळी ऐशने हलवा बनवला होता. तो हलवा खाऊन बीग बीं सह सर्वांनी सुनबाईंचे तोंड भरू न कौतुक केले होते. आपली पत्नी एक उत्तम 'कुक' असल्याचे अभिषेक मानतो.
अभिषेकही पाकक लेत ऐश्‍वर्याच्या तोडीस तोड आहे. मम्मी जया बच्चन कडून स्वयंपाकातले नुस्के अभिषेकने शिकून घेतले आहेत. त्याच्यामते स्वयंपाक करणे म्हणजे एक 'स्ट्रेस बस्टर' अँक्टीव्हीटी आहे.

Web Title: Celebrity's 'kitchen' fund!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.