अखेर सुशांतच्या 'डिप्रेशन'च्या रहस्यावरुन पडदा उठणार, CBI समोर मानसोपचारतज्ज्ञ हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 03:32 PM2020-09-03T15:32:50+5:302020-09-03T15:49:09+5:30

सीबीआयला आतापर्यंत तपासात सुशांतची हत्या झाल्याचा कोणताच पुरावा मिळालेला नाही.

Cbi quizzed sushant singh rajputs psychiatrist susan walker | अखेर सुशांतच्या 'डिप्रेशन'च्या रहस्यावरुन पडदा उठणार, CBI समोर मानसोपचारतज्ज्ञ हजर

अखेर सुशांतच्या 'डिप्रेशन'च्या रहस्यावरुन पडदा उठणार, CBI समोर मानसोपचारतज्ज्ञ हजर

googlenewsNext

सुशांतसिंग राजपूत प्रकरण आता सीबीआयसाठीही एक मोठे रहस्य बनले आहे. रिपोर्टनुसार सीबीआयला आतापर्यंत तपासात सुशांतची हत्या झाल्याचा कोणताच पुरावा मिळालेला नाही. तसेच त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा ही कोणातच पुरावा अद्याप सीबीआयच्या हाती लागलेला नाही. आता तपास आत्महत्येच्या दिशेने करण्यात येतो आहे. सीबीआयने सुशांत प्रकरणात डिप्रेशनच्या बाजून फोकस करण्यास सुरुवात केली आहे. आज सीबीआयने सुशांतचे मानसोपचार तज्ज्ञ सुसान वॉकर यांना चौकशीसाठी बोलवले आहे. सुजन यांच्या चौकशीनंतर या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.

कुटुंबीयांचा दाव - डिप्रेशनमध्ये नव्हता सुशांत 
सुशांतच्या डिप्रेशनबाबत कुटुंबीय सतत असे म्हणतायेत की, तो डिप्रेशनमध्ये कधीच नव्हता. बुधवारी सुशांतच्या कुटुंबीयाचे वकील विकास सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी म्हटले, एखादा माणूस अस्वस्थ झाला असेल किंवा तणाव कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेत असेल किंवा झोपेच्या गोळ्या घेत असेल तर त्याला डिप्रेशन नाही म्हणून शकत. 


सुशांतचे कुटुंब करणार कायदेशीर कारवाई
 सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनी मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे इशारा दिला. कोणताही निर्माता वा दिग्दर्शक सुशांतच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार नाही किंवा त्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहू शकणार नाही. असे झाल्यास सुशांतचे कुटुंब कायदेशीर कारवाई करू शकते. सुशांत वा त्याच्या कुटुंबाबद्दल चुकीची माहिती देणा-या मीडिया हाऊसविरोधातही सुशांतचे कुटुंब कायदेशीर कारवाई करू शकते.

Web Title: Cbi quizzed sushant singh rajputs psychiatrist susan walker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.