कॅटरिनाला ‘जोर का धक्का’??
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 17:46 IST2016-07-13T12:16:13+5:302016-07-13T17:46:13+5:30
‘चिकनी चमेली’या आयटम साँगनंतर कॅटरिना कैफ मोठ्या पडद्यावर फारसा जलवा दाखवू शकलेली नाही. फ्लॉप चित्रपट आणि रणबीर कपूरसोबतच्या ब्रेक-अपनंतर ...

कॅटरिनाला ‘जोर का धक्का’??
‘ िकनी चमेली’या आयटम साँगनंतर कॅटरिना कैफ मोठ्या पडद्यावर फारसा जलवा दाखवू शकलेली नाही. फ्लॉप चित्रपट आणि रणबीर कपूरसोबतच्या ब्रेक-अपनंतर कॅटरिनाच्या करिअरला ओहटी लागलेली दिसते आहे. कॅटरिना वापसीसाठी पूर्ण प्रयत्न असली तरी २०१६मध्ये कॅटचे ‘ग्लॅमर’ काहीसे कमी झाले, असेच दिसतेय. हे वर्ष कॅटरिनासाठी फारसे चांगले म्हणता येणार नाही. गतवर्षी कॅटरिनाचा ‘फँटम’ सर्वांत मोठा फ्लॉप ठरला. या धक्क्यातून कॅट अद्यापही सावरू शकलेली नाही. ‘फँटम’नंतर ‘फितूर’कडून कॅटरिनाला मोठी अपेक्षा होती. पण हा चित्रपटही सुपर फ्लॉप ठरला. नाही म्हणायला ‘जग्गा जासूस’ आणि ‘बार बार देखो’ हे चित्रपट कॅटरिनाच्या हाती आहेत. मात्र ते रिलीज व्हायला अवकाश आहे. अशातच आता कॅटरिनाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एका प्रतिष्ठित क्लोदिंग लाईनने कॅटरिनाचा करार वाढवण्यास नकार दिला आहे. कॅटरिना आता नव्या पिढीला आकर्षित करण्याइतपत तरूण राहिलेली नाही, असे या ब्रांडला वाटते आहे. त्यामुळेच ब्रांडने कॅटरिनाऐवजी नव्या चेहºयाला करारबद्ध केले आहे. साहजिकच कॅटरिनासाठी हा मोठा धक्का आहे. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर कॅटरिनाला ब्रांड स्तरावर नुकसान सोसोवे लागू शकते, अशी भीती होती. आता ही भीती खरी ठरताना दिसत आहे.
![]()
कॅटरिनाच्या जवळच्या लोकांच्या मते, अन्य प्रतिस्पर्धी हिरोईन्सच्या तुलनेत आपण मागे पडत असल्याचे कॅटरिनालाही जाणवते आहे. त्यामुळे वापसीसाठी ती जोरदार प्रयत्न करते आहे. मोठे मोठे फिल्ममेकर्स आणि ए लिस्टेट स्टार्ससोबत कॅटरिनाच्या भेटीगाठी याचाच एक भाग आहे. पण तूर्तास तरी या भेटींचा कॅटरिनाला फारसा फायदा झालेला दिसत नाही. रणबीरपासून वेगळे झाल्यानंतर कॅटरिनाने आपले सर्व लक्ष फिटनेस केंद्रीत केले आहे. फिट आणि सेक्सी दिसण्याचे तिचे प्रयत्न आहेत. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर काहीच दिवसात कॅटरिनाचा ड्रेसिंग सेन्स बदललेला दिसला. ती सेक्सी ड्रेसेसेमध्ये दिसू लागली. लोकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्याची धडपड यातून दिसते आहे. एकंदर काय तर, बॉलिवूडच्या चिकन्या चमेलीवर करिअरसाठी धडपड करण्याची वेळ आलीयं...