Catfight : दीपिका पादुकोनने प्रियंका चोपडाच्या आईला दिले सडेतोड उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 18:51 IST2017-03-11T13:21:01+5:302017-03-11T18:51:01+5:30
दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियंका चोपडाची आई मधू चोपडा यांनी दीपिका पादुकोन हिच्याकडे इशारा करीत माझ्या मुलीची कोणासोबतच तुलना केली ...
.jpg)
Catfight : दीपिका पादुकोनने प्रियंका चोपडाच्या आईला दिले सडेतोड उत्तर?
द न दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियंका चोपडाची आई मधू चोपडा यांनी दीपिका पादुकोन हिच्याकडे इशारा करीत माझ्या मुलीची कोणासोबतच तुलना केली जाऊ शकत नसल्याचे म्हटले होते. आता दीपिकानेही याच दिशेने काहीसा इशारा करीत माझा हक्क हॉलिवूडवर नव्हे तर बॉलिवूड असल्याचे म्हटले आहे. दीपिकाचे हे वक्तव्य प्रियंकाच्या आईने केलेल्या वक्तव्याकडे इशारा देणारा ठरत असल्याने आगामी काळात प्रियंका दीपिकामधील ‘कोल्डवॉर’ रंगण्याची चिन्हे आहेत.
‘पद्मावती’मध्ये काम करीत असलेल्या दीपिकाने म्हटले की, माझ्यासाठी हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव एकसारखाच आहे. मात्र हॉलिवूडमध्ये मिळालेल्या संधीचे श्रेय हे पूर्णत: माझ्या आतापर्यंतच्या बॉलिवूड प्रवासावर अवलंबून आहे. बॉलिवूडमधील माझ्या गाजलेल्या सिनेमांमुळेच मला हॉलिवूडमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे आजही माझा हक्क बॉलिवूडवरच आहे.
![]()
पुढे बोलताना दीपिकाने म्हटले की, हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. परंतु येथील सेट बॉलिवूडमधील सेट सारखेच आहे. दोन्हीकडे सिनेमाची क्रिएटिव्ह प्रोसेस सारखीच आहे. त्यामुळे मी हॉलिवूडकडे काही तरी वेगळे करिअर करीत आहे, अशा दृष्टीने कधीच बघितले नाही.
खरं सागायचं तर सध्या माझे पूर्ण लक्ष ‘पद्मावती’ या सिनेमावर आहे. मला माहीत नाही, परंतु जेव्हा मी या सिनेमाच्या सेटवर कॅमेºयासमोर जाते तेव्हा मला असे वाटते की मी स्वत:लाच सरप्राईज करत आहे. मी हॉलिवूडमध्ये केवळ प्रोफेशनल जीवन जगण्यासाठी गेली होती. तेथील लोकांना भेटणे, त्यांच्याकडून दर दिवसाला काही तरी शिकण्यासारखे होते. थोडक्यात हा संपूर्ण अनुभव एक वेगळाच उत्साह निर्माण करणारा होता, असेही दीपिकाने म्हटले.
ALSO READ : Catfight : दीपिका पादुकोनशी तुलना केल्याने प्रियंका चोपडाची आई संतापली
आता दीपिकाने दिलेले हे उत्तर प्रियंका चोपडाची आई मधू चोपडा यांना तर दिले नसावे ना, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रियंकाची दीपिकाशी होत असलेल्या तुलनेमुळे प्रियंकाची आई मधू चोपडा संतापली होती. माझ्या मुलीची कोणासोबतही तुलना केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. तसेच माझ्या मुलीच्या काम करण्याच्या पद्धतीत इतरांच्या तुलनेत खूप फरक असल्याचे म्हणत त्यांनी एकप्रकारे दीपिकाला डिवचले होते. आता दीपिकाकडूनही एकप्रकारचे डिवचणारेच स्टेटमेंट दिले गेल्याने आगामी काळात दोघींमध्ये कॅटफाइट रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.