कॅटरिना कॅन फ्लाय..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 18:06 IST2016-07-19T12:28:44+5:302016-07-19T18:06:09+5:30
कॅटरिना चारच दिवसांपूर्वी फेसबुकवर अॅक्टिव्ह झाली. काही वेळापूर्वी कॅटरिनाने एक व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. डान्स प्रॅक्टिस करतानाचा हा व्हिडिओ म्हणजे अगदीच कल्पनेपलीकडचा आहे.

कॅटरिना कॅन फ्लाय..
क टरिना कैफच्या फेसबुक पेजने आधीच धमाका केलाय. केवळ चार दिवसांत कॅटच्या फेसबुक पेजला ४५ लाख लोकांनी लाईक्स केले. कॅटरिना चारच दिवसांपूर्वी फेसबुकवर अॅक्टिव्ह झाली. काही वेळापूर्वी कॅटरिनाने एक व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. डान्स प्रॅक्टिस करतानाचा हा व्हिडिओ म्हणजे अगदीच कल्पनेपलीकडचा आहे. कॅट तिच्या ट्रेनरसोबत रिहर्सल करतेय. ती लिफ्ट घेते ... एक क्षण जणू हवेत उडते आणि अगदी अलगद ट्रेनरच्या कवेत विसावते..असेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटते. ‘आय बिलीव्ह आय कॅन फ्लाय..इफ आय रिहर्सल इनफ...’ असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. तेव्हा तुम्हीही बघाच!