Youtube vs TikTok Controversyवर कॅरी मिनाटीचा 'यल्गार', रॅप साँगला मिळाले 2 कोटींहून जास्त व्ह्युज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 18:19 IST2020-06-06T18:19:14+5:302020-06-06T18:19:44+5:30
भारताचा लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटीच्या यल्गारने युट्यूबवर खळबळ माजवली आहे. व्हिडिओला मिळतोय फॅन्सकडून चांगला रिस्पॉन्स

Youtube vs TikTok Controversyवर कॅरी मिनाटीचा 'यल्गार', रॅप साँगला मिळाले 2 कोटींहून जास्त व्ह्युज
भारताचा लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी म्हणजेच अजेय नागर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. युट्यूब व्हर्सेस टिकटॉकच्या वादामुळे कॅरी मिनाटी सातत्याने चर्चेत येत आहे. खरेतर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक प्रकरणी अजेय नागरने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामुळे महायुद्ध रंगले होते. या व्हिडिओने युट्यूबरवर सर्वात कमी वेळात जास्त व्ह्युज मिळविणारा व्हिडिओचा रेकॉर्ड बनवला होता. मात्र काही टिकटॉक स्टार्सच्या विरोधानंतर कॅरी मिनाटीचा व्हिडिओ हटविण्यात आला. त्यानंतर आता कॅरी मिनाटीचा रँप साँग समोर आले आहे. या रॅप साँगचं नाव यल्गार आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्याने आपल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.
यल्गार हे रॅप साँग कॅरी मिनाटीने 5 जूनला रिलीज केले. काही तासातच या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला. युट्यूबवर हा व्हिडिओ ट्रेंड करतो आहे आणि 24 तासाहून कमी वेळात या गाण्याने 21 मिलियनहून जास्त व्ह्युज मिळविले. या रॅप साँगला 4.2 मिलियनहून जास्त लाइक्स या गाण्याला मिळाले.
कॅरी मिनाटीचे हा व्हिडिओ चाहत्यांना खूप भावतो आहे आणि कमेंट्सच्या माध्यमातून या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.
कॅरी मिनाटी म्हणजेच अजेय नागरने मागील महिन्यात युट्यूब व्हर्सेस टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. युट्यूब व्हर्सेस टिकटॉक द एण्ड असे या व्हिडिओचे टायटल होते. या व्हिडिओत त्याने प्रसिद्ध टिकटॉक स्टार आमिर सिद्दीकीला रोस्ट केले होते.
त्यानंतर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक या वादाने जोर धरला आणि कॅरी मिनाटीचा व्हिडिओ मापदंडाविरोधी असल्याचे कारण देत युट्यूबवरुन हटविला.