लग्नासाठी मी सोडू शकते करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 16:34 IST2016-08-28T11:04:02+5:302016-08-28T16:34:02+5:30

 ‘काला चश्मा’ मधील कॅटरिना कैफचा हॉट लुक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. तिने ‘बार बार देखो’ चित्रपटासाठी तिचे वजनही ...

Career I can leave for marriage | लग्नासाठी मी सोडू शकते करिअर

लग्नासाठी मी सोडू शकते करिअर

 
काला चश्मा’ मधील कॅटरिना कैफचा हॉट लुक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. तिने ‘बार बार देखो’ चित्रपटासाठी तिचे वजनही घटवले आहे. कोणताही प्रोजेक्ट तिच्याकडे आला की, ती त्यावर जीव लावून काम करत असते. आणि तिच्या मेहनतीला यश हे मिळतच असते. मात्र, तिचे नुकतेच केलेले वक्तव्य हे थोडेसे विसंगत वाटते.

ती म्हणते,‘ मी लग्नासाठी माझे करिअरही सोडू शकते.’ थोडंसं विचित्र नाही का वाटत? कारण जी अभिनेत्री एवढे मनापासून उत्तम अभिनय करते. ती असे कसे काय म्हणू शकते? पण, हे खरे आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने कॅटला त्याची ‘प्रेरणा’ मानले होते. तेव्हा कॅटला प्रचंड राग आला होता.

आता तिने त्याच पत्रकाराला मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘जर मला वाटत असेल की, करिअरपेक्षाही मला लग्न महत्त्वाचं वाटतेय तर मी नक्कीच ते करेन. घर सांभाळण्यात आणि मुले मोठी करण्यात जर मला समाधान असेल तरी मी ते करू शकेन. पण, जर दोन्हीपैकी मला एक निवडावे लागले तर मी लग्नाचा पर्यायच निवडेल.

Web Title: Career I can leave for marriage