रेखासोबत दिसणाऱ्या 'या' सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का? शशी कपूर यांनी मारली होती कानाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 14:17 IST2023-09-07T14:15:46+5:302023-09-07T14:17:02+5:30

या अभिनेत्रीने तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांचं मन जिंकलं. कोण आहे ही अभिनेत्री?

can you recognise this actress standing in front of rekha she has also won miss india title | रेखासोबत दिसणाऱ्या 'या' सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का? शशी कपूर यांनी मारली होती कानाखाली

रेखासोबत दिसणाऱ्या 'या' सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का? शशी कपूर यांनी मारली होती कानाखाली

सोशल मीडियावर जुने फोटो नेहमी व्हायरल होत असतात. अनेकदा त्यांना ओळखणंही कठीण होतं. अशाच एका एव्हरग्रीन अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोत रेखासोबत एक सुंदर अभिनेत्री दिसत आहे. या अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षीच मिस इंडियाचा किताब पटकावला. या अभिनेत्रीने तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांचं मन जिंकलं. कोण आहे ही अभिनेत्री?

हा थ्रोबॅक फोटो १९८३ सालचा आहे. हिंदी सिनेमा 'निशान'च्या वेळचा हा फोटो आहे. यामध्ये रेखा दिसत आहे तर सोबत एक सुंदर अभिनेत्रीही दिसत आहे. फोटो पाहून तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलंत का? तर ही अभिनेत्री आहे पूनम ढिल्लो. ८० च्या दशकात तिने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. 

डॉक्टर बनायचं होतं पण बनली मिस इंडिया 

पूनम ढिल्लो चा जन्म १८ एप्रिल १९६२ साली झाला. ती अभ्यासात खूप हुशार होती. तिला डॉक्टर बनायचं होतं. म्हणूनच तिने चक्क यश चोप्राच्या सिनेमालाही नकार दिला होता. कारण तिला शिक्षणावर फोकस करायचा होता. १६ वर्षांची असताना तिने मिस इंडिया टायटल जिंकले. 

शशी कपूरने कानाखाली मारली

माध्यम रिपोर्ट्सनुसार, एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शशी कपूर यांना पूनम ढिल्लोला कानाखाली मारायची असते. यश चोप्रा यांना हा सीन खूप नॅचरल हवा होता म्हणून पूनम पासून हे लपवण्यात आलं. अॅक्शन म्हणताच शशी कपूर यांनी पूनमच्या खरोखरंच कानाखाली मारली. नंतर त्यांना पूनम यांची माफी मागावी लागली.

पूनम ढिल्लो यांनी १९७८ साली 'त्रिशूल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'नूरी','काला पत्थर','रेड रोज','बसेरा','यह वादा रहा','नमस्ते लंडन' सारख्या सिनेमात काम केलं. तर २०२३ मध्ये 'नयी पहचान' या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

Web Title: can you recognise this actress standing in front of rekha she has also won miss india title