‘कॉॅफी विद डी’च्या निर्मात्यांना मिळाली अंडरवर्ल्डमधून धमकी; प्रदर्शन लांबणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 19:45 IST2017-01-04T19:45:14+5:302017-01-04T19:45:14+5:30
‘कपिल शर्मा शो’मधील डॉक्टर मशहूर गुलाटी हे पात्र साकारणारा अभिनेता सुनील ग्रोव्हरचा आगामी चित्रपट ‘कॉफी विद डी’च्या अडचणी वाढत ...

‘कॉॅफी विद डी’च्या निर्मात्यांना मिळाली अंडरवर्ल्डमधून धमकी; प्रदर्शन लांबणार?
नुकतीच कॉफी विद डीच्या निर्मात्यांनी दिल्लीच्या पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल के ली आहे. या तक्रारीत निर्मात्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. निर्माता विनोद रमानी आणि दिग्दर्शक विशाल मिश्रा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आम्हाला अंडरवर्ल्डने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमच्या चित्रपटातील दाऊदशी संबंधित असलेली सर्व दृष्ये कमी करावीत असे सांगण्यात आले आहे, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा, असे नमूद केले आहे. या धमकी मागचे कारण चित्रपटाच्या कथेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
या चित्रपटात अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमवर कॉमेडी करण्यात आली आहे. कॉफी विद डी या चित्रपटात कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर एका पत्रकाराची भूमिका करीत असून, तो डॉन दाऊद इब्राहिमचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतोत, यात तो यशस्वी देखील होतो. एकंदरीत या चित्रपटातून सुनील ग्रोव्हर दाऊद इब्राहिमची इज्जत धुळीस मिळविण्यास तयार आहे असे म्हणता येईल.
चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक या पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीसोबतच एक आॅडिओ टेप देखील दिला आहे. यात एका माणसाचा आवाज असून, तो धमकी देताना ऐकू येतो. तो स्वत:ला दाऊदचा खास छोटा शकीलचा माणूस असल्याचे सांगतो आहे. टेपमधील संभाषणानुसार ‘हा फोन कोणत्याही प्रकारची रक्कम मागण्यासाठी केला नाही. भाईच्या नावावर ज्याला जेवढा पैसा कमवायचा आहे त्याने तो कमवावा, मात्र भाईच्या नावावर कॉमेडी करणे ही भाईची इज्जत धुळीस मिळविण्यासारखे आहे, यामुळे असे जेवढी दृष्ये असतील त्यांनी ते तत्काळ काढून टाकावेत.
दिग्दर्शक विशाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणारा व्यक्ती कोण आहे हे माहित नसल्याचे संपूर्ण माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. चित्रपटाच्या पीआरकडून याची माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटात सुनील ग्रोव्हर अर्णब नावाच्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.