अधिक वयस्क सामग्रीच्या चित्रपटांना मिळणार ए/सी प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 16:57 IST2016-06-11T11:27:30+5:302016-06-11T16:57:30+5:30

केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या शाम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अधिक वयस्क सामग्री असणाºया चित्रपटांसाठी आता ए/सी ...

A / c certificate to get more adult content films | अधिक वयस्क सामग्रीच्या चित्रपटांना मिळणार ए/सी प्रमाणपत्र

अधिक वयस्क सामग्रीच्या चित्रपटांना मिळणार ए/सी प्रमाणपत्र

ंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या शाम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अधिक वयस्क सामग्री असणाºया चित्रपटांसाठी आता ए/सी श्रेणी देण्याची शिफारस केली आहे. खबरदारीसोबत वयस्कचे प्रमाणपत्र देण्याची सूचना यात करण्यात आली आहे.
भूमिका, मंडी, निशांत सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाºया बेनेगल यांच्या अनुसार समितीने अद्याप अंतिम अहवाल सादर केलेला नाही. ‘आही सरकारला अंतरिम अहवाल दिला आहे. ज्याची माहिती दिली जाऊ शकत नाही. आम्ही अधिक वयस्क सामग्री असणाºया चित्रपटांना अ‍ॅडल्ट विथ कॉशन किंवा ‘ए/सी’ प्रमाणपत्र देण्याबाबत विचार केला आहे.’ असे बेनेगल म्हणाले.
त्यांच्या अनुसार ‘यु/ए’च्या अनुसार आम्ही अजून दोन श्रेणी देण्याची शिफारस केली आहे. ज्यात यु/ए १२ प्लस आणि यु/ए १५ प्लस यांचा समावेश आहे. यापेक्षा मी अधिक काही सांगू शकत नाही. आणखी एक अहवाल आम्ही तीन ते चार दिवसात देणार आहोत. सरकार अंतिम निर्णय घेईल. शिफारशींच्या आधारे काहीही सांगणे उचित ठरणार नाही. २० जूनपूर्वी अहवाल तयार होईल. ही अहवाल जमा करण्याची अंतिम तारीख आहे, असे बेनेगल यांनी सांगितले.
यावर्षी जानेवारी महिन्यात केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळात सुधारणा करण्यासाठी बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. विशेषत: मंडळ बºयाच वेळा आपल्या निर्णयामुळे अडचणीत येते. बेनेगल यांनी ‘उडता पंजाब’ हा चित्रपट पाहिला. बेनेगल यांच्या अनुसार दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी सुंदर काम केले आहे. परीनिरीक्षणाच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या वादावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Web Title: A / c certificate to get more adult content films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.