एक बंगला बने न्यारा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 06:47 IST2016-01-16T01:20:01+5:302016-02-11T06:47:02+5:30

बॉलिवूड अँक्टर्स घेताहेत नवीन घर आपलं स्वत:च घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. शानदार महालात चित्रपटांची शूटिंग करणारे बॉलिवूड ...

A bungalya banayara .. | एक बंगला बने न्यारा..

एक बंगला बने न्यारा..

लिवूड अँक्टर्स घेताहेत नवीन घर
आपलं स्वत:च घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. शानदार महालात चित्रपटांची शूटिंग करणारे बॉलिवूड अँक्टर्ससुद्धा कायम आपल्या हक्काच्या घराच्या शोधात असतात. लग्न झालेले असो किंवा नसो. कोणी स्वत:चे घर खरेदी केले आहे तर कोणी नवीन घराच्या शोधात दिसत आहेत. इतकेच काय तर घर खरेदी केल्यावर काहींनी लगेचच त्या घरात शिफ्टिंगही केले आहे. असेच काही बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या नव्या घरांची ही माहिती..
रणबीर सिंह : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने गोरेगाव येथे स्वत:चा फ्लॅट खरेदी केला असून तो तेथे शिफ्टही झाला आहे. 'बाजीराव मस्तानी' सिनेमाच्या शूटिंगकरिता त्याने बांद्रयातील आईवडिलांचे घर सोडल्याची चर्चा आहे. रणवीरच्या बांद्रास्थित घरापासून फिल्म सिटीपर्यंतचे अंतर सुमारे २0 किमी आहे. मात्र ट्रॅफिकमुळे हे अंतर कापायला दीड तासांहून अधिक वेळ लागतो. परिणामी त्याचा जास्त वेळ हा प्रवासात जात असल्याने त्याने गोरेगावमध्ये घर घेतले आहे.
रणबीर कपूर : अभिनेता रणबीर कपूर याने मैत्रिण कैटरिना कैफसह राहण्यासाठी मुंबईतील बांद्रय़ात नवीन घर घेतल्याचे समजते. कैट रणबीरला भेटण्यासाठी नेहमी त्याच्या घरी जाते. यामुळे रणबीरचे वडील ऋषी कपूर अर्थात चिंटू अंकल नाराज होते आणि त्यामुळेच त्याने हे नवीन घर घेतल्याची चर्चा आहे. या घराच्या इंटेरिअरचे काम सध्या सुरू आहे.
सोनम कपूर : सोनम कपूरने आईवडिलांपासून दूर राहण्याचा निर्णय घेत बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथील सिग्नेचर आयलँड अपार्टमेंटमध्ये डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. ७ हजार चौरस फुटांच्या या फ्लॅटची किंमत तब्बल ३0 कोटी आहे. हे घर घेण्यामागे या बिल्डिंगमध्ये असलेले मिनी थिएटर हे मुख्य कारण असल्याचेही बोलले जात आहे. सोनमला या घरात शिफ्ट होण्यासाठी अजून १ वर्ष लागेल असेही सांगितले जात आहे.
परिणीती चोप्रा : अभिनेत्री परिणीती चोप्रानेही काही महिन्यांपूर्वी खार येथे एक नवीन आलिशान फ्लॅट खरेदी केला असून त्याची किंमत २२ कोटी आहे. क्वाँटम टॉवरमध्ये असलेल्या या फ्लॅटमध्ये चार बेडरूम, हॉल आणि किचन आहे. परिणीती या नव्या घरात शिफ्ट झाली असून तिने नुकतेच नव्या घरासाठी पॅकिंग करतानाचे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केले होते.
ऐश्‍वर्या राय-बच्चन : अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चन हिने नुकताच बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथील सिग्निया आयल्स अर्पाटमेंटमध्ये आलिशान फ्लॅट घेतला आहे. ५,५00 चौ.फूट क्षेत्रफळ असलेल्या या फ्लॅटची किंमत तब्बल २१ कोटी आहे. फू'६ी''>२ल्लीँं.स्रं६ं२'ं१''ें३.ूे/फू'६ी''> फू'६ी''>ऋीं३४१ी/फू'६ी''>

Web Title: A bungalya banayara ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.