पुस्तकाच्या गठ्ठयावर बसून ट्विंकल खन्नाने दिली पोझ, नेटिजन्सला आला राग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 12:44 IST2017-10-25T07:14:50+5:302017-10-25T12:44:50+5:30
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्नाचे सध्या काय सुरु आहे तर ट्रोल होतेय आणि या ट्रोल ...

पुस्तकाच्या गठ्ठयावर बसून ट्विंकल खन्नाने दिली पोझ, नेटिजन्सला आला राग!
ब लिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्नाचे सध्या काय सुरु आहे तर ट्रोल होतेय आणि या ट्रोल होण्यामागचे कारण काय तर ट्विंकलचा ताजा फोटो. होय, अलीकडे ट्विंकलने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. याच फोटोशूटमधील एका फोटोवरून नेटिजन्सनी ट्विंकलला धारेवर धरलेय. या फोटोत असे काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. या फोटोमध्ये ट्विंकलने पुस्तकांवर बसून पोझ दिली आहे. तिचा हा अंदाज नेटिजन्सला भावला नाही आणि ती ट्रोल झाली.
ट्विंकलने ‘वोग’ मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी हे फोटोशूट केले आहे. या फोटोत ट्विंकलने नाईट ड्रेस घातलेला आहे. पुस्तकांच्या गठ्ठ्यावर बसलेल्या ट्विंकलचा एक पाय स्टुलावर आहे. पण ट्विंकल पुस्तकांवर पाय ठेवून बसली असल्याचे समजून लोकांनी तिला आडव्या हातांनी घेतले. ‘मॅम, वेरी राँग...युवर फिट आॅन बुक़..व्हेरी बॅड’ असे एका युजरने लिहिले. पुस्तके हे माता सरस्वतीचे प्रतिक आहे, अशा शब्दांत एका युजरने ट्विंकलला लक्ष्य केले. पण अर्थातच या ट्रोलिंगचा ट्विंकलवर काहीही फायदा झाला नाही. कारण ट्विंकलच्या मते ती चुकलेली नव्हतीच. त्यामुळे तिने हा फोटो नव्याने पोस्ट करत, उलट ट्रोल करणा-यांनाच फैलावर घेतले.
![]()
ALSO READ: ट्विंकल खन्नाने २८० रुपयांवरून दुकानदाराला सुनावले; वाचा नेमका काय आहे किस्सा!
‘ चटकन संतापणा-या लोकांसाठी...माझे पाय स्टुलवर आहे. पुस्तकांवर नाही. कारण माझ्या पायांची धूळ पुस्तकांच्या कव्हरवर लागावी, असे मला वाटत नाही. इतके सोडले तर पुस्तकांवर बसण्यात, ती जवळ घेऊन झोपण्यात किंवा बाथरूममध्ये ती वाचत बसण्यात मला काहीही अडचण नाही. बुद्धीची देवता पूजा केल्याने नव्हे तर तुम्ही वाचाल तेव्हाच तुमच्या जवळ येईल. या पुस्तकातल्या किड्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम...,’असे ट्विंकलने लिहिले आहे.
बॉलिवूडची हिरोईन राहून चुकलेली ट्विंकल सध्या पुस्तके लिहिण्यात व्यस्त आहे आणि तिने प्रॉडक्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. ट्विंकलने प्रोड्यूस केलेला ‘पॅडमॅन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत.