आमिर खानच्या मुंबईतील आलिशान घरावर बुलडोझर, मिस्टर परफेक्शनिस्टचं घर तुटण्यामागे काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:58 IST2024-12-05T17:57:42+5:302024-12-05T17:58:16+5:30

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरासंदर्भात वृत्त समोर येत आहे. लवकरच आमिर खानच्या अपार्टमेंटवर बुलडोझर चालणार आहे.

Bulldozer on Aamir Khan's luxury house in Mumbai, what is the reason behind Mr. Perfectionist's house breaking down? | आमिर खानच्या मुंबईतील आलिशान घरावर बुलडोझर, मिस्टर परफेक्शनिस्टचं घर तुटण्यामागे काय आहे कारण?

आमिर खानच्या मुंबईतील आलिशान घरावर बुलडोझर, मिस्टर परफेक्शनिस्टचं घर तुटण्यामागे काय आहे कारण?

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) मुंबईच्या पाली हिल भागात राहतो. तिथे त्याचे घर आहे, जे पाडण्यात येणार आहे. त्याच्या घरावर बुलडोझर चालणार असून घर रिडेव्हलेपमेंटसाठी गेले आहे. २०२३ पासून याबाबतचे नियोजन सुरू आहे. आता त्याच्या घराचे काम सुरू झाले आहे.

आमिर खान ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीत २४ अपार्टमेंट आहेत, त्यापैकी ९ आमिर खानचे आहेत. त्याची ही इमारत ४० वर्षांहून अधिक जुनी होती, म्हणूनच तिचा पुनर्विकास केला जात आहे. सोसायटीची अॅटमोस्पेअर रिएलिटीसोबत भागीदारी झाली आहे. इमारतीच्या पुनर्विकास योजनेत आमिर खानचा पूर्ण सहभाग आहे. नवीन स्ट्रक्चरमध्ये लोकांना ५५ ते ६० टक्के अधिक क्षेत्रफळ असलेली घरे मिळणे अपेक्षित आहे.  अपार्टमेंटच्या पुनर्विकासाची किंमत ८० हजार ते १,२५,००० रुपये प्रति चौरस फूट आहे.

या चित्रपटात दिसला होता आमिर खान 
आमिर खान लाल सिंग चड्ढा या चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत होती. हा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक होता. यानंतर त्याने लापता लेडीज चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात तो इन्स्पेक्टरची भूमिकाही साकारणार होता. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक आणि आमिरच्या एक्स पत्नीने या भूमिकेत रवी किशनला कास्ट केले आहे. सलाम वेंकी या चित्रपटात त्याने पाहुण्यांची भूमिकाही केली होती.

'सितारे जमीन पर'मध्ये दिसणार मिस्टर परफेक्शनिस्ट
आता आमिर खान सितारे जमीन परमध्ये दिसणार आहे. 'तारे जमीन' या हिट चित्रपटाचा हा सीक्वल आहे. आमिर या चित्रपटाची निर्मितीही करत आहे. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Bulldozer on Aamir Khan's luxury house in Mumbai, what is the reason behind Mr. Perfectionist's house breaking down?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.