समुद्र किनारी नवरा व मुलीसोबत ब्रुना अब्दुलाने केले एन्जॉय, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:57 IST2020-02-12T12:54:26+5:302020-02-12T12:57:09+5:30
ब्रुना अब्दुला हिने पती व मुलीसोबत समुद्राच्या पाण्यात मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

समुद्र किनारी नवरा व मुलीसोबत ब्रुना अब्दुलाने केले एन्जॉय, फोटो झाले व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल ब्रुना अब्दुल्ला तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असतो. ब्रुना नुकतीच आई बनली आहे आणि तिने फोटो इंस्टाग्राम शेअर केले आहेत.
ब्रुना अब्दुला हिने पती व मुलीसोबत समुद्राच्या पाण्यात मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
ब्रुना अब्दुलाने जवळपास पाच महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला आहे. प्रेग्नेंसीनंतरही ब्रुनाच्या बॉडीवर जराही फरक पडला नाही.
ब्रुना अब्दुलाने मुलीसोबत फोटो काढले. या फोटोत ती खूप आनंदी दिसते आहे.
यावेळी तिने सनलाईटदेखील एन्जॉय केलं. त्यावेळचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.
ब्रुनाने जुलै २०१८ साली बॉयफ्रेंड अॅलनसह साखरपुडा केला होता. त्यानंतर मे २०१९मध्ये दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. खासगी पद्धतीने दोघांनी विवाह केला होता.
लग्न म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट या कागदाचे तुकडे नव्हेत. दोन व्यक्तींना एकत्र ठेवण्यासाठी हे कागद पुरेसे नसल्याचे ब्रुनाने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
ब्रुना 'आय हेट लव स्टोरी' आणि 'ग्रँड मस्ती' या चित्रपटांमध्ये झळकली होती. याशिवाय 'खतरों के खिलाडी', 'डान्सिंग क्वीन', 'नच बलिये-६' मध्येही ब्रुना पाहायला मिळाली होती.