कंगणा झाली आनंदित !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 09:49 IST2016-05-28T04:19:17+5:302016-05-28T09:49:17+5:30
कंगणा राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वादामुळे दोघांच्याही करिअरमध्ये खुपच अडचणी आल्या. पण, आता ते वाद थंड झाल्याने त्यांचे ...

कंगणा झाली आनंदित !
ंगणा राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वादामुळे दोघांच्याही करिअरमध्ये खुपच अडचणी आल्या. पण, आता ते वाद थंड झाल्याने त्यांचे चित्रपटाचे शूटिंगही व्यवस्थितपणे सुरू झाले आहे. हृतिक ‘काबील’ मध्ये तर कंगणा ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
कंगणा राणावतला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने तिच्यासोबत काम करण्याची इच्छा असणाºया अभिनेत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आता या यादीत इरफान खानचे नाव समाविष्ट झाले आहे. वेल, इरफान खान हा स्वत: एक चांगला अभिनेता असून त्याला कंगणासोबत काम करावेसे वाटते आहे, म्हटल्यावर चांगलेच आहे ना!
इरफानला तिच्यासोबत काम करावयाचे आहे असे कळाल्यानंतर मात्र कंगणालाही प्रचंड आनंद झाला. तिच्यासोबत काम करण्यासाठी तो किती उत्सुक आहे हे सांगताना तो म्हणतो,‘ एक वेळ स्क्रिप्टची मागणी असेल की, ‘कंगणा हिरो बनणार आणि मला ‘हिरोईन’ व्हावे लागणार असेल तर मी त्यासाठीही तयार आहे. ’