#BreakingNews: ​हृतिक रोशनचं बनणार ‘सुपर30’चा हिरो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 10:49 IST2017-09-25T05:19:59+5:302017-09-25T10:49:59+5:30

हृतिक रोशनने विकास बहलचा ‘सुपर30’ हा चित्रपट साईन केल्याची बातमी आली आणि यानंतर काही दिवसांनी अचानक हृतिकने हा सिनेमा ...

#BreakingNews: Hrithik Roshan's 'Super30' hero to be made! | #BreakingNews: ​हृतिक रोशनचं बनणार ‘सुपर30’चा हिरो!

#BreakingNews: ​हृतिक रोशनचं बनणार ‘सुपर30’चा हिरो!

तिक रोशनने विकास बहलचा ‘सुपर30’ हा चित्रपट साईन केल्याची बातमी आली आणि यानंतर काही दिवसांनी अचानक हृतिकने हा सिनेमा सोडल्याची बातमी सगळीकडे पसरली. या बातमीपाठोपाठ मग अनेक तर्कवितर्कही आलेच. हृतिकला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नसल्याने त्याने हा चित्रपट सोडला, असे काहींनी म्हटले तर काहींनी याचे कनेक्शन थेट कंगना राणौतशी जोडले. विकास बहलच्याच ‘क्वीन’नंतर कंगनाचे नशीब फळफळले होते. कंगनासोबतच्या वादानंतर हृतिकला कंगनाशी संबंधित कुठल्याही व्यक्तीसोबत काम करायचे नाहीय आणि म्हणून त्याने विकास बहलचा हा चित्रपट धुडकावून लावला, अशी कहानी काहींनी ऐकवली. पण आता सगळे सूर्यप्रकाशाइतके  स्पष्ट झाले आहे. होय, हृतिकने हा चित्रपट सोडलेला नाहीच मुळी. कारण,  ‘सुपर30’फेम आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित या बायोपिकचा  हिरो हृतिक आणि हृतिक हाच असणार आहे.




मध्यंतरी या चित्रपटासंदर्भात हृतिक ‘सुपर30’ आनंद कुमार यांनाही भेटला होता. खुद्द आनंद कुमार यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ‘आताच मुंबई येथून पाटण्याला परतलो आहे; मात्र हृतिक रोशनसोबत जी भेट झाली ती विसरणे शक्य नाही’, असे आनंद कुमार यांनी हृतिकसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले होते.  

ALSO READ : WHAT ? ​कंगना राणौतमुळे हृतिक रोशनने नाकारला ‘सुपर30’??

आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.   जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून  निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात. त्यांची पत्नी,भाऊ आणि आनंद स्वत: मुलांना कोचिंग देतात तर त्यांची आई मुलांच्या जेवणासाठी धडपडत असते. ही संस्था कुणाकडूनही देणगी किंवा दान स्वीकारत नाही तर, आनंद कुमार त्यासाठी विशेष ट्युशन क्लासेस घेतात आणि त्यातून येणारा पैसा या मुलांवर खर्च करतात. 

Web Title: #BreakingNews: Hrithik Roshan's 'Super30' hero to be made!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.