BREAKING: अमिताभ बच्चन आणि जया बच्चन दोघेही राहतात वेगळे अमर सिंह यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 16:16 IST2017-01-23T10:32:54+5:302017-01-23T16:16:19+5:30

नेहमी रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यांविषयी अनेक बातम्या येत असतात.मात्र आता खुद्द अमिताभ बच्चन यांचे निकटवर्तीय आणि समाजवादी ...

BREAKING: Amitabh Bachchan and Jaya Bachchan both live together; Amar Singh's disclosure is different | BREAKING: अमिताभ बच्चन आणि जया बच्चन दोघेही राहतात वेगळे अमर सिंह यांचा खुलासा

BREAKING: अमिताभ बच्चन आणि जया बच्चन दोघेही राहतात वेगळे अमर सिंह यांचा खुलासा

हमी रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यांविषयी अनेक बातम्या येत असतात.मात्र आता खुद्द अमिताभ बच्चन यांचे निकटवर्तीय आणि समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंह यांनीच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या काही वर्षापासून एकत्र राहत नसल्याचे रहस्य उघड केले आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष फुटण्याचे खापर हे फक्त अमर सिंह यांच्यावरच फोडेल जात आहे. यांवर बोलत असताना त्यांनी बच्चन कुटुंबियांवर निशाणा धरल्याचे पाहायला मिळाले. कोणत्याही कारणाला अमर सिंहच जबाबदार असल्याचे गृहित धरले जाते. आता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या भांडणाला अमर सिंहच जबाबादार असल्याचे तुम्ही म्हणाल? असा सवाल अमर सिंह यांनीच उपस्थित केला. आपली आणि बच्चन परिवाराची ओळख होण्याआधीपासूनच एकजण प्रतीक्षा बंगल्यात तर दुसरा जनक बंगल्यात वास्तव्यास असल्याची माहितीही अमर सिंह यांनी दिली.



समाजवादी पक्षात पडलेल्या अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव या पिता-पुत्राच्या फुटीला अमरसिंह जबाबदार असल्याचा ठपका सध्या ठेवला जात आहे. या आरोपांना फेटाळताना बच्चन परिवारात निर्माण झालेल्या फुटीलाही मलाच जबाबदार धरल्याच्या  बातम्याही निराधार असल्याचा दावा अमर सिंह यांनी केला.त्यामुळे बच्चन परिवाराशी एकेकाळी जवळीक असलेल्या अमर सिंह यांनी बच्चन कुटुंबियांवर बोलल्यामुळे पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्यांवरच्या चर्चेला उधाण आल्याचे दिसतंय. 

यावेळी अमर सिंह फक्त  बच्चन कुटुंबियांवर बोलून थांबले नाहीतर तर त्यांनी अंबानी कुटुंबालाही टार्गेट केले.अंबानी कुटुंबातही पैशांच्या कारणांवरूनच फुट पडल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.ऐश्वर्या बच्चन आणि जया बच्चन यांनाही मीच वेगळं केले असा आरोप मीडियाने माझ्यावर ठेवला.अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यात दुरावा निर्माण करण्याला मलाच जबाबदार धरण्यात आले.अंबानी कुटुंबातही मीच फुट पाडली असल्याचाही आरोप माझ्यावरच लावण्यात आला. जिथे जिथे भांडणं होतात तिथे तिथे मलाच कारणीभूत समजत माझ्यावरच ठपका लावला जात असल्याचेही यावेळी अमर सिहं यांनी म्हटले आहे.  

Web Title: BREAKING: Amitabh Bachchan and Jaya Bachchan both live together; Amar Singh's disclosure is different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.