बॉक्स ऑफिसवर अजय देवगणसोबत या कपूर स्टारचा होणार सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 12:23 IST2018-01-09T06:53:57+5:302018-01-09T12:23:57+5:30
अजय देवगणने 2017 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सुपरहिट चित्रपट गोलमाल अगेन बॉलिवूडला दिला होता. त्यानंतर 2018मध्ये पुन्हा एकदा अजय देवगण ...

बॉक्स ऑफिसवर अजय देवगणसोबत या कपूर स्टारचा होणार सामना
अ य देवगणने 2017 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सुपरहिट चित्रपट गोलमाल अगेन बॉलिवूडला दिला होता. त्यानंतर 2018मध्ये पुन्हा एकदा अजय देवगण कॉमेडी चित्रपट घेऊन येणार आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला या चित्रपटाची माहिती दिली होती. टोटल धमाल सिरिजच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंदर कुमार करणार आहे. यात मुख्य भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे तसेच त्याच्यासोबत अर्शद वारसी. अनिल कपूर आणि माधुरी दिक्षितसारखे जबरदस्त कलाकार दिसणार आहे. जवळपास 17 वर्षानंतर अनिल कपूर आणि माधुरी दिक्षित एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. माधुरी आणि अनिल कपूरच्या जोडीने आतापर्यंत खेल, बेटा, तेजाब सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे. जानेवारी महिन्यापासून मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.
चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता अशी माहिती मिळतेय की, चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट 7 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. याच दरम्यान अर्जुन कपूराचा नमस्ते इंग्लंड चित्रपट देखील रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोघांमध्ये सामना करावा लागणार आहे.
दिवाळीत आमिर खानचा बिग बजेट चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तान रिलीज होणार आहे. या चित्रपटाची स्टार-कास्ट मजबूत आहे. यात आमिरसोबत अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ झळकणार आहेत. त्यामुळे टोटल धमाल चित्रपटाची रिलीज डेट निर्मात्याने डिसेंबरमध्ये पुढे ढकलण्यातच शहाणपणा समजला. जर निर्मात्याने टोटल धमाल चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली नसती तर याचा फाटका चित्रपटालाच बसला असता.
ALSO RAED : या कारणामुळे बहिणीच्या बर्थ डे पार्टीत चेहरा लपविताना दिसला अर्जुन कपूर, पाहा फोटो!
आता हे बघणं औत्सुकत्याचे ठरणार आहे की, प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला पसंती देतात. गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा एक हिट चित्रपटाच्या शोधात आहेत. त्यातच त्यांच्यासमोर आता माधुरी दिक्षित, अनिल कपूर सारख्या सिनिअर कलाकारांचा आव्हान असणार आहे. यात आता कोण बाजी मारते हे बघायला आपल्याला डिसेंबर महिन्यांची वाट बघावी लागणार आहे.