BOX OFFICE : टायगर श्रॉफच्या ‘बागी-२’ची शंभर कोटींच्या क्लबमध्ये धडक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 18:49 IST2018-04-04T13:19:24+5:302018-04-04T18:49:36+5:30

दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाच्या ‘बागी-२’ या अ‍ॅक्शन चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर खळबळ उडवून देताना प्रदर्शनाच्या काही दिवसांतच शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान ...

BOX OFFICE: Tiger Shroff's 'Bargi-2' hit a hundred crore club! | BOX OFFICE : टायगर श्रॉफच्या ‘बागी-२’ची शंभर कोटींच्या क्लबमध्ये धडक!

BOX OFFICE : टायगर श्रॉफच्या ‘बागी-२’ची शंभर कोटींच्या क्लबमध्ये धडक!

ग्दर्शक साजिद नाडियाडवालाच्या ‘बागी-२’ या अ‍ॅक्शन चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर खळबळ उडवून देताना प्रदर्शनाच्या काही दिवसांतच शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. खरं तर प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपटाने यशाची शिखरे गाठली. ओपनिंग डेला २५ कोटी रुपयांची कमाई करीत सर्वत्र एकच खळबळ उडवून दिली. तसेच एवढ्या मोठ्या कमाईसह ओपनिंग करणारा या वर्षाचा पहिला चित्रपटाचा मानही आपल्या नावे केला. त्याचबरोबर यंग जनरेशनमध्ये पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या कमाईची ओपनिंग करून देणारा टायगर पहिलाच अभिनेता ठरला. 

विशेष म्हणजे टायगरने हे रेकॉर्ड आपल्या नावे करतानो अभिनेता वरुण धवन, रणवीर सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा, रणबीर कपूर आणि अर्जुन कपूर यांना पिछाडीवर टाकले आहे. चित्रपटाने पहिल्या वीकेण्डपर्यंत ७३.१० कोटी रुपयांची कमाई करीत बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला. बॉक्स आॅफिसवर आतापर्यंत सर्वाधिक फर्स्ट डे कलेक्शन करणाºया चित्रपटांमध्ये ‘बागी-२’ला १४ वे स्थान मिळाले आहे. या चित्रपटाचा जोर अजूनही कायम असून, टायगरच्या अ‍ॅक्शनवर केवळ प्रेक्षकच नव्हे तर इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारही फिदा झाले आहेत. 
 
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि हृतिक रोशनने तर टायगरवर मुक्तकंठाने स्तुतिसुमने उधळताना आम्हाला त्याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले. अक्षयने टायगरचे कौतुक करताना म्हटले की, ‘बॉलिवूड हे गर्वाने सांगू शकतो की, त्यांच्याकडेही टोनी जा आहे. टोनी थाई मार्शल आर्टिस्ट, अभिनेता आणि स्टंटमॅन आहे. तर हृतिकने टायगरला बेस्ट अ‍ॅक्शन हिरोचा टॅग दिला. साजिद नाडियाडवाला आणि फॉक्स स्टार स्टुडिओअंतर्गत सहनिर्मित ‘बागी-२’ला नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेन्मेंटच्या वतीने प्रस्तुत करण्यात आले. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून, प्रेक्षकांना चित्रपट तुफान आवडत आहे. 

Web Title: BOX OFFICE: Tiger Shroff's 'Bargi-2' hit a hundred crore club!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.