BOX OFFICE : तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स आॅफिसवर ‘टायगर जिंदा है’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:37 IST2018-01-10T10:07:59+5:302018-01-10T15:37:59+5:30
सुपरस्टार सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट तिसºया आठवड्यातही बॉक्स आॅफिसवर चांगले प्रदर्शन करीत आहे. बॉक्स आॅफिस इंडियाच्या ...

BOX OFFICE : तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स आॅफिसवर ‘टायगर जिंदा है’!
स परस्टार सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट तिसºया आठवड्यातही बॉक्स आॅफिसवर चांगले प्रदर्शन करीत आहे. बॉक्स आॅफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने रिलिजच्या तिसºया मंगळवारी (१९ दिवस) २.५० कोटी रुपयांची कमाई केली. या कमाईबरोबरच चित्रपटाने आतापर्यंत ३१४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाने रिलिजच्या पहिल्याच आठवड्यात २०६ कोटी रुपये कमविले. दुसºया आठवड्यात ८५ कोटी तर तिसºया आठवड्यात (सुरुवातीच्या पाच दिवस) २२.७५ कोटींची कमाई केली.
तर जगभरातील कमाईचे आकडे पाहता या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. तसेच ५०० कोटी कमविणारा सलमानचा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. या अगोदर ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ या चित्रपटांनी हा करिष्मा केला आहे. बॉक्स आॅफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वाधिक वर्ल्डवाइल्ड ग्रोसर चित्रपटांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.
दरम्यान, चित्रपटाने सुरुवातीच्या दोन दिवसात ५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. तिसºया दिवशी हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला. चौथ्या दिवशी चित्रपटाने १५० कोटींचा आकडा गाठला. तर सात दिवसांत २०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. दहाव्या दिवशी २५० कोटी तर सोळाव्या दिवशी चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा पार केला. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘एक था टायगर’चे एकूण बजेट ७५ कोटी रुपये होते. तर ‘टायगर जिंदा है’चे बजेट १५० कोटी इतके आहे.