Box Office Collection : सहाव्या दिवशी घटली ‘मणिकर्णिका’ची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 14:34 IST2019-01-31T14:33:17+5:302019-01-31T14:34:11+5:30

वीकेंडला ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. पण रविवारनंतर मात्र चित्रपटाच्या कमाईला घसरण लागली.

Box Office Collection: manikarnika day 6 box office collection falls down | Box Office Collection : सहाव्या दिवशी घटली ‘मणिकर्णिका’ची कमाई!

Box Office Collection : सहाव्या दिवशी घटली ‘मणिकर्णिका’ची कमाई!

ठळक मुद्दे येत्या दिवसांत ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’समोरचे आव्हान आणखी कठीण होतेय. कारण उद्या १ फेब्रुवारीला सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकतो आहे.

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ गत शुक्रवारी रिलीज झाला. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची शौर्यगाथा दाखवणाऱ्या या चित्रपटासाठी कंगनाने अपार मेहनत घेतली. चित्रपटावर १०० ते १२५ कोटी रूपये खर्च केले गेलेत. वीकेंडला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. पण रविवारनंतर मात्र चित्रपटाच्या कमाईला घसरण लागली. ओव्हरसीजमध्ये कंगनाच्या या चित्रपटाला ब-यापैकी प्रतिसाद मिळतोय. पण भारतात मात्र या चित्रपटाची कमाई दरदिवशी घटत असलेली दिसतेय.




ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’च्या कमाईचे ताजे आकडे जारी केले आहेत. त्यानुसार, काल बुधवारी या चित्रपटाने केवळ ४.५० कोटी रूपयांचा गल्ला जमवला. त्याआधी रिलीजच्या पहिल्या दिवशी ८.७५ कोटी, शनिवारी १८.१० कोटी, रविवारी १५.७० कोटी, सोमवारी ५.१० आणि मंगळवारी ४.७५ कोटींची कमाई केली. कमाईचा एकूण आकडा ५६.९० कोटींच्या घरात आहे.




प्रजासत्ताक दिनी या चित्रपटाने एकदम १८.१० कोटींची कमाई केल्याने सगळ्यांच्याच अपेक्षा दुणावल्या होत्या. पण त्यानंतर दरदिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा खाली येतोय. जाणकारांचे मानाल तर विकी कौशल स्टारर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटामुळे कंगनाच्या या चित्रपटाला प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. येत्या दिवसांत ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’समोरचे आव्हान आणखी कठीण होतेय. कारण उद्या १ फेब्रुवारीला सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकतो आहे. या चित्रपटासमोर ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ किती तग धरतो, ते बघूच.
ओव्हरसीजमध्ये ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ने सुमारे १४.२४ कोटींचा आकडा पार केला आहे. अमेरिका आणि कॅनडात या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.

Web Title: Box Office Collection: manikarnika day 6 box office collection falls down