बोमन म्हणतो, इंग्रजीत ‘स्टँडअप कॉमेडी’ करणारा मी पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 16:58 IST2016-04-21T11:27:31+5:302016-04-21T16:58:50+5:30

विनोदी चित्रपटांद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे, बोमन ईरानी. बॉलिवूडमध्ये संधी मिळण्याआधी बोमन काय करायचा माहितीयं? ...

Bowman says, I am the first to make a standup comedy in English | बोमन म्हणतो, इंग्रजीत ‘स्टँडअप कॉमेडी’ करणारा मी पहिला

बोमन म्हणतो, इंग्रजीत ‘स्टँडअप कॉमेडी’ करणारा मी पहिला

नोदी चित्रपटांद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे, बोमन ईरानी. बॉलिवूडमध्ये संधी मिळण्याआधी बोमन काय करायचा माहितीयं? बोमन स्टँड अप कॉमेडी करायचा. सुमारे १८ वर्षांपूर्वी बोमनने ‘स्टँडअप कॉमेडी’ करणे सुरु केले होते. बोमन या प्रवासाबद्दल भरभरून बोलतो. इंग्रजीत ‘स्टँडअप कॉमेडी’ करणारा मी पहिला होतो, असा त्याचा दावा आहे. लहान मोठे क्लब, रेस्टॉरंट आणि विविध व्यासपीठांवर शंभर दीडशे लोकांपुढे मी माझी कला दाखवायचो. नेपाळच्या अनेक हॉटेलातही मी ‘स्टँडअप कॉमेडी’ केली, असे त्याने सांगिले. बोमन  ‘संता बंता प्रायव्हेट लिमिटेड’ या चित्रपटात दिसणार आहे. आकाशदीप सबीर याच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट उद्या चित्रपटगृहात झळकणार आहे.

Web Title: Bowman says, I am the first to make a standup comedy in English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.