Border 2: पाच दिवसांतच 'बॉर्डर २'ची क्रेझ संपली? कमाईत मोठी घट, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:07 IST2026-01-28T14:07:31+5:302026-01-28T14:07:57+5:30

प्रदर्शनाच्या दिवशी आणि त्यानंतरही 'बॉर्डर २' चांगली कमाई करत होता. मात्र आता सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

border 2 sunny deol varun dhawan box office collection day 5 | Border 2: पाच दिवसांतच 'बॉर्डर २'ची क्रेझ संपली? कमाईत मोठी घट, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

Border 2: पाच दिवसांतच 'बॉर्डर २'ची क्रेझ संपली? कमाईत मोठी घट, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

Border 2: 'धुरंधर'नंतर बॉक्स ऑफिसवर सध्या 'बॉर्डर २'चं राज्य आहे. 'बॉर्डर' सिनेमाच्या या सीक्वलच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. अखेर २३ जानेवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच 'बॉर्डर २'चे शो सगळीकडे हाऊसफूल होत होते. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सिनेमाची लाखो तिकिटे विकली गेली होती. प्रदर्शनाच्या दिवशी आणि त्यानंतरही 'बॉर्डर २' चांगली कमाई करत होता. मात्र आता सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

'बॉर्डर २' सिनेमाचं पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ३० कोटी आणि दुसऱ्या दिवशी ३६ कोटींची कमाई केली होती. तीनच दिवसांत 'बॉर्डर २'चे एकूण कलेक्शन १२१.७० कोटी रुपयांवर पोहोचले होते. चौथ्या दिवशीही या सिनेमाने तब्बल ५९ कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र पाचव्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने पाचव्या दिवशी २० कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत 'बॉर्डर २'ने २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'बॉर्डर २' सिनेमात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, मोना सिंह, सोनम बाजवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'बॉर्डर २'नंतर आता 'बॉर्डर ३'बाबत चाहत्यांना उत्सुकता असून सिनेमाच्या टीमनेही याबाबत अपडेट दिले आहेत. 

Web Title : बॉर्डर 2: क्या पांच दिनों में क्रेज खत्म? बॉक्स ऑफिस पर गिरावट।

Web Summary : रिलीज़ के बाद 'बॉर्डर 2' की कमाई में भारी गिरावट आई है। फिल्म ने पांच दिनों में ₹200 करोड़ की कमाई की, लेकिन शुरुआती रिलीज़ के बाद से कलेक्शन में गिरावट आई है। फिल्म में सनी देओल, वरुण धवन और अन्य कलाकार हैं।

Web Title : Border 2: Craze fades in five days? Box office decline.

Web Summary : 'Border 2' sees a significant drop in earnings after a strong opening. The film grossed ₹200 crore in five days, but collections have declined since the initial release. The movie stars Sunny Deol, Varun Dhawan and others.