'बॉर्डर २'ची १० दिवसांतच ३०० कोटींकडे वाटचाल, बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय सनी देओलचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 17:51 IST2026-02-01T17:51:34+5:302026-02-01T17:51:51+5:30

प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'बॉर्डर २'चे शो हाऊसफूल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा सिनेमा १० दिवसांतच ३०० कोटींकडे वाटचाल करण्याच्या तयारीत आहे. 

border 2 sunny deol ahan shetty varun dhawan movie box office collection details | 'बॉर्डर २'ची १० दिवसांतच ३०० कोटींकडे वाटचाल, बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय सनी देओलचा सिनेमा

'बॉर्डर २'ची १० दिवसांतच ३०० कोटींकडे वाटचाल, बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय सनी देओलचा सिनेमा

सनी देओलचा 'बॉर्डर २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच दमदार कमाई करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर २३ जानेवारीला प्रदर्शित झालेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'बॉर्डर २'चे शो हाऊसफूल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा सिनेमा १० दिवसांतच ३०० कोटींकडे वाटचाल करण्याच्या तयारीत आहे. 

'बॉर्डर २'ने पहिल्याच दिवशी ३० कोटींचा बिजनेस केला. त्यानंतर पहिल्या वीकेंडला सिनेमाने ९० कोटींपर्यंत कमाई केली होती. मंडे टेस्टमध्येही सिनेमा पास झाला होता. सोमवारी या सिनेमाने ५९ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर मात्र सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसत होतं. असं असलं तरी आत्तापर्यंत सिनेमाने २५२ कोटींचा बिजनेस केला आहे. आता रविवारी सिनेमा किती कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


'बॉर्डर २'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या सिनेमात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. ९०च्या दशकात गाजलेल्या 'बॉर्डर' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. या सिनेमातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं आहे.  'बॉर्डर २' नंतर मेकर्सने सिनेमाच्या पुढच्या भागाबाबतही हिंट दिली आहे. 

Web Title : सनी देओल की 'बॉर्डर 2' 10 दिनों में ₹300 करोड़ के करीब।

Web Summary : सनी देओल की 'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिस पर हिट, सिर्फ 10 दिनों में ₹300 करोड़ के करीब। गणतंत्र दिवस पर रिलीज हुई फिल्म में वरुण धवन और दिलजीत दोसांझ जैसे सितारे हैं। यह 90 के दशक की लोकप्रिय फिल्म 'बॉर्डर' का सीक्वल है।

Web Title : Sunny Deol's 'Border 2' nearing ₹300 crore in 10 days.

Web Summary : Sunny Deol's 'Border 2' is a box office hit, nearing ₹300 crore in just 10 days. The film, released on Republic Day, has seen houseful shows and features stars like Varun Dhawan and Diljit Dosanjh. It's a sequel to the popular 90s movie, 'Border'.