प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, 'बॉर्डर २' फक्त १४९ रुपयांत पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:40 IST2026-02-03T12:40:14+5:302026-02-03T12:40:44+5:30
'बॉर्डर २' ची तिकिटं झाली स्वस्त, निर्मात्यांनी दिली प्रेक्षकांना मोठी भेट

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, 'बॉर्डर २' फक्त १४९ रुपयांत पाहता येणार
Border 2 Movie Ticket Price Drop : सनी देओलच्या बहुचर्चित 'बॉर्डर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विजयाचा झेंडा फडकावला आहे. अवघ्या ११ दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हेच प्रेम पाहून निर्मात्यांनी आता प्रेक्षकांना एक 'रिटर्न गिफ्ट' देण्याचा निर्णय घेतला असून, चित्रपटाच्या तिकिटांवर मोठी सवलत जाहीर केली आहे.
वाढत्या तिकिट दरांमुळे ज्यांना अद्याप हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चित्रपट निर्माते 'टी-सीरीज'ने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे की, प्रेक्षकांना आता हा चित्रपट मंगळवारी केवळ १४९ रुपयांमध्ये मोठ्या पडद्यावर पाहता येईल.
११ दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून आपली पकड मजबूत ठेवली आहे. भारतात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्यानंतर, हा चित्रपट आता जगभरात ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ आहे.