करिनाच्या आयुष्यावर येणार पुस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 19:30 IST2016-05-06T14:00:45+5:302016-05-06T19:30:45+5:30
अभिनेत्री करिना कपूर आजच्या घडीला एक यशस्वी अभिनेत्री मानली जाते. तिच्या आयुष्यावर आधारित ‘ब्रँड बेबो’ हे पुस्तक लवकरच येणार ...

करिनाच्या आयुष्यावर येणार पुस्तक
अ िनेत्री करिना कपूर आजच्या घडीला एक यशस्वी अभिनेत्री मानली जाते. तिच्या आयुष्यावर आधारित ‘ब्रँड बेबो’ हे पुस्तक लवकरच येणार आहे. या पुस्तकात तिच्या कारकिर्दीचा आजवरचा प्रवास लोकांना वाचायला मिळणार आहे. करिना लग्नानंतरही चित्रपटात काम करत असून तिने त्यानंतरही अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकात तिच्या यशस्वी चित्रपटांविषयी आणि तिच्या खाजगी आयुष्याविषयीही वाचायला मिळणार आहे.