इमरान हाश्मीचे ‘कॅन्सरलढ्या’वर पुस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 01:16 IST2016-02-20T08:16:30+5:302016-02-20T01:16:30+5:30

चित्रपटसृष्टी आल्यानंतर गेली काही वर्षे ‘सिरीयल किसर’ अशी इमेज कोणाची आहे? असे विचारताच, डोळ्यापुढे एकच नाव येते ते म्हणजे ...

Book on Imran Hashmi's 'Kanceraldya' | इमरान हाश्मीचे ‘कॅन्सरलढ्या’वर पुस्तक

इमरान हाश्मीचे ‘कॅन्सरलढ्या’वर पुस्तक

त्रपटसृष्टी आल्यानंतर गेली काही वर्षे ‘सिरीयल किसर’ अशी इमेज कोणाची आहे? असे विचारताच, डोळ्यापुढे एकच नाव येते ते म्हणजे इमरान हाश्मी. मात्र हाच इमरान आता बदलला आहे. 

त्यांच्या मुलाला (अयान) तीन वर्षांचा असतानाच किडनीचा कॅ न्सर झाला. त्यानंतर तब्बल तीन वर्षे इमरानने अयानसह या कॅ न्सरविरुद्ध जो लढा दिला, त्याला जे काही अनुभव आले, त्याला दिलेले शब्दरूप म्हणजे त्याचे आगामी पुस्तक ‘किस आॅफ लाईफ- हाऊ अ सुपर हिरो अ‍ॅन्ड माय सन डिफीटेड कॅ न्सर.’ अयान आता सहा वर्षांचा असून पूर्णपणे बरा आहे. बिलाल सिद्दीकी हा इमरानचा मित्र या पुस्तकाचा सहलेखक आहे.

अयानला होणाºया वेदना इमरानला पाहवत नव्हत्या. तशाही अवस्थेत त्याला घेऊन त्याने अमेरिका गाठली. तेथील रुग्णालयातील उपचार, डॉक्टरांची मदत, समाजाचा दृष्टिकोन, त्यानंतर मुंबईत परत आल्यानंतर अयानच्या शाळेतील आठवणी, शिक्षकांच्या त्याच्याविषयीच्या भावना, या विषयीचा वृत्तांत या पुस्तकात आहे. 

वेळीच कॅन्सर लक्षात आल्यास त्याच्यावर उपचार करता येतात अन् कॅन्सरमुक्त होता येते, असे इमरानने म्हटले आहे. सुपर हिरो बॅटमॅन ज्या प्रकारे शत्रूशी लढा देतो व विजयी होतो. चांगल्या प्रवृत्तीचा नेहमीच वाईट प्रवृत्तीविरुद्ध विजय होतो त्याप्रकारे अयाननेही कॅ न्सरला पराभूत केले. डॉक्टरांनीही मोलाची मदत केली. त्याविषयी या पुस्तकात सर्व काही आहे. या पुस्तकाने इमरान ‘सिरीयल किसर’ची इमेज बदलून तो एक जबाबदार पिताही आहे, हे स्पष्ट होईल, असे दिसते. इमरानचे ‘राझ रिबुट’ व ‘मर्डर-४’ हे चित्रपट लवकरच येत आहेत.

Web Title: Book on Imran Hashmi's 'Kanceraldya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.