अजय देवगणच्या 'मैदान' चित्रपटाच्या रिलीजबाबत बोनी कपूर यांनी केली ही घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 20:35 IST2020-06-24T20:34:01+5:302020-06-24T20:35:04+5:30
गेल्या काही दिवसांपासून अजय देवगणचा चित्रपट 'मैदान'च्या रिलीजबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

अजय देवगणच्या 'मैदान' चित्रपटाच्या रिलीजबाबत बोनी कपूर यांनी केली ही घोषणा
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे. अद्यापही सिनेइंडस्ट्री पुन्हा कधी पूर्ववत होईल, याचे चित्रदेखील अस्पष्ट आहे. सध्या सर्व सिनेमांचे शूटिंग थांबलेले आहे आणि ज्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहेत त्यांना थिएटर बंद असल्यामुळे रिलीज थांबले आहे. अशात काही निर्माते त्यांचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेत आहे.
कोरोनाच्या संकटात अजय देवगणचा आगामी चित्रपट मैदानबाबतही सध्या चर्चा ऐकायला मिळत आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर आधारीत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार असल्याची चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत आहे. मात्र आता निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत घोषणा केली आहे. हा चित्रपट 11 डिसेंबर, 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मैदान चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी मैदान चित्रपटाबाबत चुप्पी तोडली आहे. त्यांनी सांगितली की, मैदान ऑनलाइन रिलीज केला जाणार नाही. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना बोनी कपूर म्हणाले की, सिनेइंडस्ट्रीत त्यांनी 40 वर्षे काढले आहेत. यादरम्यान त्यांनी बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली आणि थिएटरमध्ये रिलीज केले आहेत. असे काही सिनेमे असतात जे मोठ्या स्तरावर बनवली जातात. असे चित्रपट थिएटरमध्येच रिलीज केला पाहिजे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी बोनी कपूर खूप उत्सुक आहेत.
मैदान चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तो फुटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट बायोपिक नसून यात टीम व खेळातील काही निगडीत गोष्टी चाहत्यांना पहायला मिळणार आहे.