या राजकीय व्यक्तिला बोनी कपूर यांनी केला होता श्रीदेवी यांच्या निधनानंतरचा पहिला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:11 IST2018-02-27T10:32:37+5:302018-02-27T16:11:13+5:30

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आकस्मित मृत्यूमुळे फक्त बॉलिवूड नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. 24 फेब्रुवारी दुबईतल्या जुमैरा एमिरेट्स टावर ...

Boney Kapoor was the first person to call this political person after the death of Sridevi | या राजकीय व्यक्तिला बोनी कपूर यांनी केला होता श्रीदेवी यांच्या निधनानंतरचा पहिला फोन

या राजकीय व्यक्तिला बोनी कपूर यांनी केला होता श्रीदेवी यांच्या निधनानंतरचा पहिला फोन

िनेत्री श्रीदेवी यांच्या आकस्मित मृत्यूमुळे फक्त बॉलिवूड नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. 24 फेब्रुवारी दुबईतल्या जुमैरा एमिरेट्स टावर हॉटेलमधील रुमनंबर 2201 मध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला.काही मीडिया रिपोर्टनुसार हॉटेलमधील बाथरुममध्ये पडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळी बोनी कपूर त्या रुममध्ये होते आणि त्यांनी सगळ्यात पहिला फोन अमर सिंग यांना लावल्याचे समजते आहे. 

रिपोर्टनुसार 25 फेब्रुवारीच्या जवळपास 12.40 मिनिटांनी बोनी कपूर यांनी अमर सिंग यांना फोने केला. मात्र अमर सिंग यांचा फोन त्यावेळी सायलेंटवर होता त्यामुळे त्यांनी तो कॉल रिसिव्ह नाही केला. त्यानंतर बोनी कपूर यांनी त्यांच्या दिल्लीच्या लँडलाईनवर कॉल केला. अमर सिंग यांनी ज्यावेळी फोन उचलला तेव्हा पलीकडून बोनी कपूर यांनी वहिनी या जगात नाही राहिल्याचे सांगितले.  श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी ऐकून अमर सिंग काहीकाळ स्तब्ध झाले होते.  

बोनी कपूर तर या सगळ्या प्रकरणामुळे चांगलेच खचून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा मुलगा अर्जुन कपूर हा आज सकाळीच दुबईला  वडिलांना आधार देण्यासाठी रवाना झाला आहे. सध्या तो वडिलांसोबत दुबईतच आहे. 

श्रीदेवी यांचे पार्थिव कोणत्याही क्षणी त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येऊ शकते. इंडिया इन दुबई या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे सांगण्यात आले आहे की, मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दुबई पोलिसांनी दिलेली आहेत. त्यामुळे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्याची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन देण्यात येईल असे सूत्रांकडून समजतेय. श्रीदेवी यांचे पार्थिव अनिल अंबानी यांच्या चार्टड विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सध्या मुंबईत सुरू आहे. उद्या सकाळी ८ ते १० या दरम्यान अंतिम दर्शनासाठी पार्थिव वर्सोवा येथील श्रीदेवीच्या बंगल्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यात्रेला सुरुवात होईल. 

ALSO READ :  मोहित मारवाहच्या लग्नानंतर या कारणासाठी दुबईत थांबल्या होत्या श्रीदेवी...समोर आले खरं कारण

Web Title: Boney Kapoor was the first person to call this political person after the death of Sridevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.